हायलाइट्स:
- बुर्ज खलिफाच्या शेवटच्या ठिकाणावर चित्रीकरण
- ८२८ मीटर उंचावर झाले चित्रीकरण
- व्हिडिओची जोरदार चर्चा
जगातील सर्वात उंच ठिकाणी पहिल्यांदाच एका जाहिरातीचे चित्रीकरण करण्यात आले. या जाहिरातीची संकल्पना आणि दिग्दर्शन Emirates च्या टीमची होती. जाहिरातीत दिसरणारी स्टंट वुमन निकोल स्मिथ लुडविक ही एक व्यावसायिक स्कायडायव्हर प्रशिक्षक आहे. जगातील सर्व उंच इमारतीच्या शेवटच्या ठिकाणी निकोलशिवाय फक्त दोनच व्यक्ती पोहचल्या आहेत. यामध्ये दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम आणि हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ यांचा समावेश आहे.
या जाहिरातीचे चित्रीकरण करण्यासाठी बरीच मेहनत घेण्यात आली. चित्रीकरणाआधी प्रशिक्षण, सरावावर भर देण्यात आला. अनेक लहान गोष्टींचेही नियोजन करण्यात आले. त्याशिवाय या चित्रीकरणातील सर्वांच्या सुरक्षितेची काळजी घेण्यात आली.
‘खलीज टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वात उंचावर चित्रीकरण करताना सुरक्षितेवर अधिक भर देण्यात आला. त्यासाठी एका व्यावसायिक स्कायडायव्हर प्रशिक्षकाचा समावेश करण्यात आला. चित्रीकरण आणि सुरक्षितेसाठी आवश्यक असणारे उपकरणे बुर्ज खलिफाच्या टोकावर नेण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागला. या जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी फक्त एकच ड्रोन वापरण्यात आला. जवळपास पाच तास चित्रीकरण सुरू होते.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#वहडओ #बरज #खलफ #इमरतचय #टकवर #महल #कर #८२८ #मटर #उचवर #चतरकरण