Saturday, May 21, 2022
Home लाईफस्टाईल वैवाहिक जीवनासाठी महत्त्वाचा आठवडा; पाहा तुमचं साप्ताहिक राशिभविष्य

वैवाहिक जीवनासाठी महत्त्वाचा आठवडा; पाहा तुमचं साप्ताहिक राशिभविष्य


आज दिनांक 15 मे 2022 रविवार. तिथी वैशाख शुक्ल चतुर्दशी/पौर्णिमा. या सप्ताहात होणारे महत्त्वाचे ग्रह बदल म्हणजे बुध अस्त होणार असून सूर्याचा वृषभ राशीत प्रवेश झाला आहे. दिनांक 17 मे रोजी सकाळी 9 वाजून 32 मिनिटांनी मंगळ मीन राशीत प्रवेश करेल. शनी कुंभ राशीत उच्च अवस्थेत असेल. शुक्र गुरू मीन राशीत तर राहू मेष आणि केतू तूळ राशीत आहेत. चंद्राचं भ्रमण सप्ताहाच्या सुरवातीला तूळ राशीतून राहिल. या ग्रहस्थितीनुसार पाहूया बारा राशींचे साप्ताहिक राशीभविष्य.
मेष
राशीच्या व्यय स्थानात येणारा मंगळ कायद्याचे बंधन पाळा असे संकेत देत आहे. परदेश गमन, सन्मान मिळेल. तुमच्या हाताने काही भरीव कामगिरी होईल. राशीच्या सप्तमात चंद्र सुरवातीला अनपेक्षित घटना घडवेल. रवी. बुध आर्थिक लाभ मिळवून देईल. व्यवसाय, जोडीदाराला शुभ काळ. लाभदायक घटना घडतील. स्त्रीवर्गाची मदत मिळेल. आई वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या.सप्ताह अनुकूल.
वृषभ
व्यय राहू आणि सप्ताहाच्या सुरुवातीला शष्ठ स्थानात असणारा चंद्र मनाची घालमेल करवेल. लाभस्थानातील गुरू शुक्र मंगळ कार्यक्षेत्रात लाभ मिळवून देईल. अधिकारी व्यक्तींची गाठभेट होईल. लेखक पत्रकार व्यक्तींना उत्तम काळ आहे. भाग्य साथ देईल. मंगळ शुक्र एकत्र आहेत. काळजी घ्या. प्रवासात सांभाळून रहा. सप्ताह चांगला.
मिथुन
ग्रहसंकेत ओळखून कुठलेही प्रवास अनावश्यक धाडस टाळा. कार्यक्षेत्रात मंगळ शुभ समाचार देईल. शनी माहात्म्य किंवा सुंदरकांड वाचणे योग्य असेल. दशम स्थानातील गुरू अधिकारी व्यक्तीकडून लाभ मिळवून देईल. कलाक्षेत्रात चांगली कामगिरी कराल. व्यय राहू परदेशसंबंधी शुभ समाचार देईल. सप्ताह मिश्र फळ देईल.
कर्क
सामाजिक जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण चर्चेत असाल. काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तरी खचून जाऊ नका. सध्याचा काळ हा आपला नाही आहे ते टिकवून ठेवण्याची गरज आहे. जोडीदार जरा आक्रमक होण्याची शक्यता आहे. व्यवसाय वृद्धी होईल. सप्ताह एकूण मध्यम आहे.
सिंह
सप्ताहाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे चंद्र तूळ राशीतून भाग्यकारक घटनांची सुरुवातीपासूनच चाहूल देईल. वैवाहिक जीवनासाठी महत्त्वाचा आठवडा आहे. अधिकरप्राप्ती होईल. व्यवसायात उत्तम संधी मिळेल. शत्रू पराजित होतील. बदल घडून येणार आहे. अष्टम गुरू मंगळ सावधगिरी बाळगा असा इशारा देत आहे. आनंदात दिवस घालवा.
कन्या
सप्तम स्थानातील गुरू विवाहासाठी शुभ असून नवीन प्रस्ताव येतील. संतान चिंता दूर होईल. धार्मिक बाबतीत शुभ फळ मिळणार असून आर्थिक लाभ होतील. व्यवसाय, धंद्यासाठी अनुकूल घटना घडतील. सुरुवात आर्थिक भरभराट होईल. भाग्य आणि धर्म दोन्ही क्षेत्र शुभ फळ देतील. उत्तरार्ध शुभ जाईल.
तूळ
चंद्राचे भ्रमण राशी स्थानातून होत आहे. गृहक्षेत्रात नवी जबाबदारी घ्यावी लागेल. काही कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. श्वासासंबंधी विकार असतील तर वेळीच काळजी घ्या. संततीला भरघोस यश मिळेल. नोकरीमध्ये शुभवार्ता कानी पडतील. शैक्षणिक क्षेत्रात मोठी कामगिरी कराल. आठवडा शुभ आहे.
वृश्चिक
मंगळ आणि शुक्र भावंडांशी काही तणाव निर्माण करतील. मात्र फारशी हानी न करता त्यातून मार्ग काढतील. घर आणि वाहन घेण्यासंबंधी हालचाल कराल. त्यात नक्की यश मिळेल. प्रकृती जपणं गरजेचं आहे. मनाला अकारण नीरस वाटेल. जोडीदाराला अधिकार प्राप्ती होईल. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. योग आणि व्यायाम करा. सप्ताह मिश्र फळ देईल.
धनु
आर्थिक ताणतणाव, कौटुंबिक अडचणी याने त्रस्त व्हाल. प्रवास आणि त्यातून होणारे नुकसान मिळवून देणारा आठवडा आहे. बंधू भेट संभवते. भावंडाना यश कीर्ती देणारा काळ असून संततीच्या सुखाची कामना कराल. शत्रू पराजित होतील. आठवडा फलदायी ठरेल.
मकर
राशीतून बाहेर गेलेला शनी ताण कमी करेल. शनी मंगळ योगाचे प्रभाव दिसून येतील. गुरूशुक्र युती आकस्मिक फळ देण्यास फायद्याची ठरेल. घर आणि वाहन यासंबंधी काही निर्णय घ्याल. आर्थिक लाभ संभवतात. बुध रवी कुटुंबात वाढ करेल. सप्ताह आनंदात घालवा.
कुंभ
राशीमध्ये आलेला शनी कुंभ व्यक्तीसाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. विवाहाचे प्रस्ताव येतील. गुरू महाराज ते पार पडण्यास मदत करतील. तुमच्यासाठी वेळ कायदा सुव्यवस्था राखण्याची आहे. कुठल्याही प्रकारचे आर्थिक देणेघेणे टाळा. नुकसान संभवते. धार्मिक ठिकाणी प्रवास होईल. सप्ताह शुभ आहे.
मीन
सप्ताहाची सुरुवात आर्थिक हानी झाल्यामुळे संथ अशी होईल. व्यय स्थानातील ग्रह परदेश गमनाचे मार्ग मोकळे करतील. लाभदायक काळ असून सर्व मार्गांनी सावध राहून व्यवहार करा. मित्रमैत्रिणीपासून धोका होऊ शकतो. धार्मिक बाबीत खर्च होईल. राशीतील गुरू शुक्र शुभ फल देतील. सप्ताह मिश्र फळ देईल.
शुभम भवतू!!

Published by:Priya Lad

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signsअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#ववहक #जवनसठ #महततवच #आठवड #पह #तमच #सपतहक #रशभवषय

RELATED ARTICLES

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

Pune NCP Protest: लाल महालात लावणीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन ABP Majha

<p>पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटिंग झाल्याचं समोर आल्यानंतर मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या लावणी शुटिंगचा संभाजी ब्रिगेडने निषेध...

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Most Popular

IPL मध्ये धोनीने खेळला शेवटचा सामना? पाहा कॅप्टन कूल काय म्हणाला

मुंबई : आयपीएल 2022 आता शेवटच्या टप्प्यात आहे. आयपीएलमध्ये कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. दरम्यान सीएसकेची टीम या वर्षी...

तुमचं मूलही दिवसेंदिवस लठ्ठ होत चालंलय? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपाय

नवी दिल्ली, 21 मे : अ‌ॅक्टीव नसल्यामुळे किंवा अनेक कारणांमुळे लहान वयातच अनेक मुले लठ्ठ होत आहेत. चाइल्डहुड ओबेसिटी रिपोर्टनुसार (Childhood Obesity Report)...

पुण्यात CNG दरवाढ, सदाभाऊंची पुन्हा केतकीच्या पोस्टवर टिप्पणी TOP News

मुंबई, 21 मे : राज्यसभेसाठी शिवसेना नेते संजय राऊत यांना चौथ्यांदा संधी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या जागेसाठी संजय राऊत यांनी आपली भूमिका...

खूनी नाल्याजवळ बचाव मोहिमेदरम्यान दरड कोसळली; थरकाप उडवणार व्हिडीओ

श्रीनगर, 20 मे : रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील एका बांधकामाधीन बोगद्याच्या जागेवर ताज्या भूस्खलनामुळे बचावकार्य थांबवण्यात आले आहे. जवळच्या डोंगराचा एक भाग...

बळकावलेल्या भागात चीनकडून पूल; परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरणवृत्तसंस्था, नवी दिल्ली: सन १९६०पासून चीनने बळकावलेल्या भागात सध्या पूलउभारणी सुरू आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. लडाखमधील पँगाँग सरोवराच्या...