Friday, August 12, 2022
Home करमणूक वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला


मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर आधारित एक नवी कोरी वेबसिरीज ‘राजी-नामा’ ही ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर लवकरच झळकणार आहे. प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी प्रस्तुत ‘राजी-नामा’चे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले आहे.
‘रानबाजार’ (Raanbaazar webseries) या वेबविश्व हादरून सोडणाऱ्या एका हिट वेबसिरीजनंतर अभिजित पानसे (Abhijit Panse) आणि चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हे भन्नाट जोडी ‘’राजीनामा’च्या निमित्ताने एकत्र येणार आहे. ही कथा प्रियम गांधी मोदी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावर आधारित असून ‘राजी-नामा’ वेबसिरीजची संकल्पना आणि लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केलं आहे. या वेबसिरीजच्या निमित्ताने आता लवकरच एक राजकीय सनसनाटी विषय पाहायला मिळणार आहे.

या वेबसिरीजची आज घोषणा करण्यात आली असून त्यासंबंधीचा एक उत्सुकता वाढवणारा विडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खुद्द चिन्मयने आपल्या इन्स्टाग्राम हॅन्डलवरून या विडिओ शेअर केला आहे. अभिजित यांचं कौशल्य एका वेबसीरिजच्या यशातून झळकत आहे, तसंच चिन्मय मांडलेकर सुद्धा फॉर्मात आहे. एकीकडे चंद्रमुखी (Chandramukhi) सारख्या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिल्यानंतर आता अभिजित पानसे यांच्यासोबत तो काय चमत्कार करून दाखवणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

अभिजित पानसे आणि राजकारणातील ज्वलंत विषय हे एक नवं समीकरण बनत चाललं आहे. रानबाजारमध्ये सुद्धा त्यांनी राजकीय थरार दाखवत एक अत्यन्त महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. आधी प्रचंड ट्रोल झालेल्या या वेबसिरिजला रिलीजनंतर विलक्षण प्रतिसाद मिळाला. एवढंच काय तर मुख्यमंत्रांच्या राजीनाम्यावर आधारित वेबसिरीजमधल्या सीनला सध्याच्या राजकीय परिस्थितीला जोडून पाहिला जात आहे. त्याजोगे अभिजित पानसे यांना दूरदृष्टी होती असाही सवाल केला जात आहे. कदाचित हा एक योगायोग असू शकतो पण अभिजित यांचं कौशल्य नावाजलं जात आहे यात शंका नाही.

हे ही वाचा- विवेक अग्निहोत्रीचा नवा कारनामा, एकीकडे मुखमंत्र्यांना शुभेच्छा तर ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला सुनावले बोल!

 अभिजित यांची खासियत म्हणजे त्यांची योग्य विषयाला हात घालायची बुद्धी. त्यांच्या चित्रपटाचे विषय हे नेहमीच हटके आणि आऊट ऑफ द बॉक्स असतात. ‘रानबाजार’ला असलेल्या सद्य स्थितीच्या आशयाने प्रेक्षकांनी सिरिजला चांगलीच पसंती दर्शवली. ‘रानबाजार’च्या घवघवीत यशानंतर आता ‘राजी-नामा’मध्येही ‘खुर्ची’साठी चाललेले राजकीय युद्ध पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हा ‘राजी-नामा’ कोणाचा आहे? तो मंजूर होणार का? नेमका कोणाकडे रोष असलेला पाहायला मिळतो? हे आणखी माहिती आल्यावर समोर येईलच. तूर्तास तरी एक चांगला विषय असणारी वेब सिरीज येऊ घातली आहे एवढं मात्र नक्की सांगता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#वबवशवत #आणख #एक #खळबळ #रनबजरनतर #खरचच #रजकरण #पनसच #नव #वबसरज #भटल

RELATED ARTICLES

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

Amit Thackeray : अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर, मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

<p><strong>Amit Thackeray :</strong> अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहे.&nbsp; मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं.&nbsp; अमित ठाकरेंवर पक्षसंघटनेची मोठी जबाबदारी आहे.&nbsp; &nbsp;पुण्यातील...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

वयाच्या 50 नंतरही राहाल निरोगी आणि फिट; आहार आणि व्यायामाच्या या टिप्स फॉलो करा

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : जेव्हा आपले वय 50 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. योग्य आहार न घेतल्याने...

दैनंदिन राशीभविष्य: धनु राशीसाठी आज सांभाळून राहण्याचा दिवस; तर कुंभ राशीला लाभ

आज दिनांक १२ऑगस्ट २०२२. वार शुक्रवार. पौर्णिमा समाप्ती सकाळी ७ .२३.आज चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दिवस आनंद निर्माण करणारा...

डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : श्रीशंकरला सहावा क्रमांक

मोनॅको : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता लांब उडीपटू मुरली श्रीशंकरला पदार्पणीय डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये सहावा क्रमांक मिळवत निराशा केली. ७.९४ मीटर ही...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....