ट्रेंट ब्रिज : भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. पण उद्यापासून सुरु होणाऱ्या या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला इतिहास रचण्याची नामी संधी आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यात कोहली आता विश्वविक्रम रचण्यासाठी सज्ज झाला आहे.
गेल्या काही सामन्यांमध्ये कोहलीला मोठी खेळी साकारता आलेली नाही. पण विराटसारखा खेळाडू हा कधीही फॉर्मात येऊ शकतो. जर विराट फॉर्मात आला आणि त्याने जर उद्यापासून सुरु होणाऱ्या सामन्यात शतक झळकावलं तर त्याच्या नावावर एक विश्वविक्रम रचला जाऊ शकतो. आतापर्यंत क्रिकेट विश्वात सर्वाधिक शतक झळकावणारा कर्णधार म्हणून कोहलीला इतिहास रचता येऊ शकतो. हा विश्वविक्रम यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावावर होता. पॉन्टिंगने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत असताना कसोटी क्रिकेटमध्ये ४१ शतकं झळकावली होती. कोहलीने या विक्रमाशी यापूर्वीच बरोबरी केली आहे. त्यामुळे कोहलीने आजच्या सामन्यात शतक झळकावलं तर त्याचे एक कर्णधार म्हणून ४२वे शतक असेल आणि त्याच्या नावावर हा विश्वविक्रम नोंदवला जाईल. त्यामुळे विराट कोहली उद्यापासून सुरु होणाऱ्या या सामन्यात शतक झळकावणार का, याकडे तमाम क्रिकेट विश्वाचे लक्ष लागेलेले असेल.
सध्याच्या घडीला कोहली हा चांगल्या फॉर्मममध्ये नाही. कारण कोहलीने आपले अखेरचे शतक हे २०१९ साली झळकावले होते आणि तेदेखील बांगलादेशबरोबर. हे शतकही वनडे क्रिकेटमध्ये पूर्ण झाले होते. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या २ वर्षांपासून तरी कोहलीला चांगला सूर गवसेलला दिसत नाही. त्याचबरोबर परदेशातील कसोटी सामन्यांमध्येही कोहली अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सर्व वाईट गोष्टी पुसुन टाकण्याची कोहलीकडे इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना ही सर्वात चांगली संधी असेल. त्यामुळे कोहली या संधीचे सोने करून शतकांचा दुष्काळ संपवणार का, याची उत्सुकता सर्व चाहत्यांना नक्कीच असेल. त्यामुळे उद्याच्या सामन्यात जेव्हा कोहली फलंदाजीला येईल, तेव्हा त्याचे शतक होतं की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#वरट #कहलल #पहलयच #कसटत #इतहस #रचणयच #सवरणसध #कर #शकत #ह #मठ #गषट