बीसीसीआयने दिले स्पष्टीकरण –
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला कोरोनाची लागण (Virat Kohli Tested Positive) झाली होती. मात्र, तो आता बरा झाला आहे, असे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दिली आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर एक कसोटी सामना खेळणार आहे. 1 जुलैपासून हा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र, त्याआधी टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी आली.
विराट कोहली याला कोरोनाची लागण झाली, याबाबतच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या. या पार्श्वभूमीवरच आता बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार याला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता तो बरा झाला आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विनला देखील कोरोनाची लागण झाली होती.
हेही वाचा – Ranji Trophy : मुंबई 42व्यांदा रणजी चॅम्पियन होणार! एकाच शाळेचे 3 विद्यार्थी ठरवणार निकाल
दरम्यान, इंग्लंडमध्ये रस्त्यांवर विराट कोहली हा मास्क न घालता दिसला होता. तसेच याप्रकारचे विराट कोहलीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनामधून बरा झाल्यावर मास्क न घालता विराट कोहली कसा फिरू शकतो, तसेच त्याच्या चाहत्यांसोबत सेल्फी कसा घेऊ शकतो, असे प्रश्न विचारले जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#वरट #कहलल #करनच #लगण #BCCI #न #दल #महततवच #महत