रोहितनं इन्स्टाग्रामवर याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. ‘धक्कादायक. पण, भारतीय टीमचा कॅप्टन म्हणून यशस्वी कारकिर्दीसाठी अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.’ अशी प्रतिक्रिया रोहितने दिली असून त्या पोस्टमध्ये त्याने विराटला टॅग केले आहे.
रोहित होणार पुढील कॅप्टन!
टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) विराटने कॅप्टन्सी सोडल्यामुळे रोहित शर्माला या फॉरमॅटची कॅप्टन्सी देण्यात आली. तसंच दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर रोहितलाच कर्णधार करण्यात आलं. तसंच दक्षिण आफ्रिका दौऱ्याची टेस्ट टीम निवडताना अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) उपकर्णधारपद हटवून रोहितला देण्यात आलं. 8 डिसेंबर 2021 ला ही घोषणा करण्यात आली होती. त्याचवेळी म्हणजेच दीड महिन्याआधीच विराटचा उत्तराधिकारी कोण, याचा निर्णय बीसीसीआय (BCCI) आणि निवड समितीने घेतला होता, असे मानले जात आहे.
…म्हणून विराट कोहलीनं कॅप्टनसी सोडली, गावसकरांचा खळबळजनक दावा
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जोहान्सबर्ग टेस्टमध्ये विराटच्या पाठीला दुखापत झाल्यानंतर राहुल उपकर्णधार असल्यामुळे त्यालाच या टेस्टमध्ये टीमचं नेतृत्व देण्यात आलं, पण आता विराटनं या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहितची कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#वरट #कहलचय #नरणयनतर #रहत #शरम #Shocked #महणल