Monday, July 4, 2022
Home क्रीडा विनेश फोगाटवर बंदी! Tokyo Olympic 2020 दरम्यान या तीन नियमांचं केलं उल्लंघन

विनेश फोगाटवर बंदी! Tokyo Olympic 2020 दरम्यान या तीन नियमांचं केलं उल्लंघन


नवी दिल्ली, 11 ऑगस्ट: गेले काही दिवस क्रिडा रसिकांसाठी पर्वणीचे दिवस होते. भारताने ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic 2020) चांगलं प्रदर्शन केलं आहे. दरम्यान भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) ऑलिम्पिक स्पर्धा महागात पडली आहे. विनेशवर तात्पुरती बंदी (temporary ban on Vinesh Phogat) आणण्यात आली आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (Wrestling Federation of India WFI) ही बंदी आणली आहे. 53 किलोग्रॅम वजनी गटातील या भारताच्या स्टार कुस्तीपटूवर तीन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. दरम्यान फेडरेशनने तिला तिची बाजू मांडण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी दिला आहे.
वृत्तसंस्था पीटीआयला रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विनेशला कोणतीही राष्ट्रीय किंवा देशांतर्गत स्पर्धा खेळता येणार नाही आहे, जोपर्यंत ती याबाबत तिची बाजू मांडत नाही. शिवाय अंतिम निर्णय हा WFI चा असणार आहे.
हे वाचा-IND vs ENG : नॉटिंघममध्ये पावसामुळे निराशा, लॉर्ड्सवर 5 दिवस असं असणार हवामान
विनेशवर आहेत हे तीन आरोप
विनेशवर मुख्यत्त्वे हे तीन आरोप करण्यात आले आहेत की, एक म्हणजे तिने टोक्यो ऑलिम्पिक दरम्यान भारतीय टीमसह राहण्यास नकार दिला. दुसरा आरोप असा आहे की भारतीय टीमच्या कोचकडून प्रशिक्षण घेण्यास नकार दिला तर तिसरा आरोप असा आहे की, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनकडून मंजुर करण्यात आलेले सिंगलेट (खेळाडूंकडून स्पर्धेदरम्यान परिधान करण्यात येणारे कपडे) तिने परिधान केले नव्हते. तिने त्याऐवजी तिचे प्रायोजक नायकीचे सिंगलेट परिधान केले. द इंडियन एक्स्प्रेसने WFI चे प्रेसिडेंट ब्रिज भुषण सिंह यांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान त्यांनी अशीही माहिती दिली की असा प्रकार पहिल्यांदा घडला नाही आहे. पण यापूर्वी खेळाडूची प्रतिष्ठा लक्षात घेता दूर्लक्ष करण्यात आले होते.
हे वाचा-Olympic चा रोमांच आणखी वाढणार, क्रिकेटच्या समावेशासाठी ICC ची बॅटिंग!
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत विनेशला सुवर्णपदकाची दावेदार मानण्यात येत होतं, मात्र तिचा बेलारुसच्या व्हेनेसाकडून पराभव झाला. टोक्योमध्ये पोहोचण्यापूर्वी विनेश तिचे कोच वोलर अकोससह हंगेरीमध्ये होती. पंधरा दिवसांच्या ट्रेनिंगनंतर ती थेट टोक्योमध्ये पोहोचली, यावेळी तिने भारतीय टीमसह ट्रेनिंग घेण्यास किंवा राहण्यास नकार दिल्याची माहिती मिळते आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#वनश #फगटवर #बद #Tokyo #Olympic #दरमयन #य #तन #नयमच #कल #उललघन

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...