Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?


मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य शिवसेना (Shiv Sena) ही महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi) आहे. तर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही अर्थातच भाजपसोबत (BJP) आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूने उमेदवार उभे करण्यात आले आहे. भाजपकडून मुंबईतील कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्य शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेना आमदार राजन साळवी यांना मतदान करण्याबाबतचा देखील व्हीप लागू केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपुढे पेच वाढण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या सुनील प्रभूंचा व्हिप ऐकला नाही तर बंडखोर आमदारांविरोधात पक्षाकडून अधिकृतपणे कदाचित कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तर दुसरीकडे भाजपसोबत सत्तेत असल्याने भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करणं शिंदे गटासाठी अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण कुणाला मतदान करतं हे उघडपणे स्पष्ट होणार आहे.

(आता व्हीप कुणाचा? शिवसेना बजावणार, एकनाथ शिंदेंसह बंडखोरांना होणार लागू?)

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व शिवसेनेच्या आमदारांसाठी व्हीप लागू केला आहे. हा व्हीप नियमानुसार सर्वच आमदारांसाठी लागू होणार आहे. पण शिवसेनेचे बंडखोर नेते सुनील प्रभू यांचा व्हीप मानतात की भाजपच्या उमेदवाराला मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेकडून विधीमंडळाचं गटनेतेपद हे अजय चौधरी यांना देण्यात आलं आहे. पण ते शिंदे गट मानण्यास तयार नाही. आपल्याला दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आपणच शिवसेनेचे गटनेता असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. गटनेते पद आणि इतर तांत्रिक मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी कोर्टात गेली आहे. कोर्टात या प्रकरणी खटला सुरु आहे. पण उद्या विधानसभेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेना आणि बंडखोर यांच्यात संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

 • अमित शहांचा फोटो बॅनरवरून का काढला? सदाभाऊ खोतांनी उत्तर न देता काढला पळ

  अमित शहांचा फोटो बॅनरवरून का काढला? सदाभाऊ खोतांनी उत्तर न देता काढला पळ

 • एकनाथ शिंदे आता शिवसेनेचे नेते नाही, उद्धव ठाकरेंचं पत्र खरं, संजय राऊतांनी केला खुलासा

  एकनाथ शिंदे आता शिवसेनेचे नेते नाही, उद्धव ठाकरेंचं पत्र खरं, संजय राऊतांनी केला खुलासा

 • 'मराठा म्हणून एकनाथ शिंदे..'; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत ज्योतिरादित्य शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत

  ‘मराठा म्हणून एकनाथ शिंदे..’; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत ज्योतिरादित्य शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत

 • 'एकनाथ शिंदेंना नेतेपदावरुन काढणं आक्षेपार्ह, न्यायालयात जाणार, पण..'; शिवसेनेच्या पत्राला केसरकरांचं भावनिक उत्तर

  ‘एकनाथ शिंदेंना नेतेपदावरुन काढणं आक्षेपार्ह, न्यायालयात जाणार, पण..’; शिवसेनेच्या पत्राला केसरकरांचं भावनिक उत्तर

 • 'फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणायला जड जातंय; पण त्यांचं कौतुक वाटतं की...', नव्या सरकारबाबत काय म्हणाले राऊत?

  ‘फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणायला जड जातंय; पण त्यांचं कौतुक वाटतं की…’, नव्या सरकारबाबत काय म्हणाले राऊत?

 • चौकशीची पिडा टळली, उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना CBI कडून क्लिन चीट!

  चौकशीची पिडा टळली, उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना CBI कडून क्लिन चीट!

 • #भेटीलागीजीवा : माऊलींची पालखी शुक्रवारी फलटण तर तुकोबारायांची पालखी निमगाव केतकी येथे मुक्कामी

  #भेटीलागीजीवा : माऊलींची पालखी शुक्रवारी फलटण तर तुकोबारायांची पालखी निमगाव केतकी येथे मुक्कामी

 • आता व्हीप कुणाचा? शिवसेना बजावणार, एकनाथ शिंदेंसह बंडखोरांना होणार लागू?

  आता व्हीप कुणाचा? शिवसेना बजावणार, एकनाथ शिंदेंसह बंडखोरांना होणार लागू?

 • विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंचा व्हीप जारी, आवाजी मतदान, कारवाईची टांगती तलवार, बंडखोरांचं काय होणार?

  विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंचा व्हीप जारी, आवाजी मतदान, कारवाईची टांगती तलवार, बंडखोरांचं काय होणार?

 • VIDEO: शिपाई ते सचिव सर्वांचं औक्षण, यशमोती ठाकूर यांनी घेतला कर्मचाऱ्यांचा भावुक निरोप

  VIDEO: शिपाई ते सचिव सर्वांचं औक्षण, यशमोती ठाकूर यांनी घेतला कर्मचाऱ्यांचा भावुक निरोप

 • शिंदे सरकारमधील 5 जणांचा पुढील आठवड्यात शपथविधी, महसूल खात्यासाठी चंद्रकांत पाटील आग्रही?

  शिंदे सरकारमधील 5 जणांचा पुढील आठवड्यात शपथविधी, महसूल खात्यासाठी चंद्रकांत पाटील आग्रही?

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#वधनसभचय #अधयकषपदसठ #सनल #परभकडन #वहप #जर #बडखर #कय #करणर

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली; मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प

Land Slide on Pune Mumbai Railway : खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प...

Ukraine Russia War : युक्रेनमधील पॉवर प्लांटजवळ रशियाचा हल्ला, भारताचं संयम राखण्याचं आवाहन

Ukraine Russia Conflict : युक्रेनमधील झापोरिझ्झ्या अणू ऊर्जा प्रकल्पाजवळ रशियाकडून हल्ले सुरु आहेत. झापोरिझ्झ्या अणू ऊर्जा प्रकल्प (...

‘शेरशाह’ चित्रपटाला एक वर्ष पूर्ण! कियाराने दिल्या हटके शुभेच्छा, म्हणाली ‘सिद्धार्थ तू तर…’

Sidharth Malhotra, Kiara Advani : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या...

मुंबई इंडियन्सची मोर्चेबांधणी सुरु, पाहा कोणत्या पाच खेळाडूंशी केला करार?

केपटाऊन, 11 ऑगस्ट: आयपीएलमधली सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी मुंबई इंडियन्सनं आता परदेशातल्या टी20 लीगमध्येही आपला संघ उतरवण्याचं ठरवलं आहे. संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि...

Nothing Phone 1 खरेदी करणाऱ्यांसोबत धोका ? फोनचे ब्राइटनेस लेव्हल दाव्यापेक्षा खूपच कमी, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली:Nothing Phone 1 Display: लाँचपूर्वी हटके, युनिक फीचर्समुळे आणि लाँच नंतर हँडसेटमध्ये येत असलेल्या समस्यांमुळे Nothing ब्रँडचा पहिला फोन, Nothing Phone 1...