जगभरातील विविध देशांचे असंख्य नागरिक भारतात वास्तव्य करतात. त्यामुळे या नागरिकांचं लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता परदेशातील नागरिकही भारतात लस घेऊ शकतात. विदेशी नागरिकांना आता CoWin App द्वारे लसीकरण करता येणार आहे.
Health Ministry has decided to allow foreign nationals residing in India to get registered on CoWin portal to take COVID vaccine. They can use their passport as ID for registration on CoWIN. Once they’re registered on this portal, they’ll get a slot for vaccination: Govt of India pic.twitter.com/f9djEZTxoE
— ANI (@ANI) August 9, 2021
हेही वाचा-डेल्टाहून अधिक प्राणघातक व्हेरिअंट येऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांच मत
खरंतर कोविन अॅपवरून लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार क्रमांकाची आवश्यकता होती. पण आता विदेशी नागरिकांना पासपोर्टद्वारे लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना उपलब्धतेनुसार स्लॉट दिला जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात परदेशी नागरिक मोठ्या संख्येनं राहत आहेत. यातील बहुतेक लोकं हे फक्त महानगरांमध्ये राहतात. अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त असल्यानं कोरोना संसर्ग वेगात पसरण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे विदेशी नागरिकांचं देखील लसीकरण होणं गरजेचं आहे.
हेही वाचा-नाशिकनंतर ठाण्यात Delta Variant चा शिरकाव; 4 रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क
कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे, देशाने लसीकरणात 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. देशाला लसीकरणात 10 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी 85 दिवस लागले होते. त्यानंतर पुढील 45 दिवसांत 20 कोटींचा आकडा पार केला होता. तर पुढच्या 29 दिवसांत 30 कोटींचा टप्पा पार केला. त्यानंतर अवघ्या 24 दिवसांत 40 कोटी आणि पुढील 20 दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#वदश #नगरकह #भरतत #लस #घऊ #शकतत #क #कदरन #घतल #मठ #नरणय