Saturday, August 13, 2022
Home विश्व विजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला, भारतीय बँकांची सरशी

विजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला, भारतीय बँकांची सरशी


नवी दिल्ली, 26 जुलै : भारतातील विविध बँकांमधून कोट्यवधींचं कर्ज (Loan) घेऊन फरार झालेला किंग्जफिशर एअरलाईन्सचा मालक विजय मल्ल्याला (Vijay Mallya) लंडन उच्च न्यायालयात (London High Court) मोठा झटका बसला आहे. विजय मल्ल्या दिवाळखोर (Bankrupt) असल्याचं न्यायालयानं मान्य केलं असून भारतातील विविध बँकांचं (Indian banks) म्हणणं न्यायालयानं मान्य केलं आहे.

काय होतं प्रकरण

भारतातील स्टेट बँक ऑफ इंडियासह 13 बँकांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली. विजय मल्ल्याने बँकांमधून कर्ज घेतलं असून त्याची परतफेड केली नसल्यामुळे त्याला दिवाळखोर जाहीर करण्यात यावं, अशी मागणी भारतातील बँकांनी केली होती. मल्ल्याची दिवाळखोरी जाहीर झाल्यानंतर त्याची बँकांकडे तारण असणारी आणि इतर संपत्तीदेखील जप्त करून, त्याचा लिलाव करण्याचा अधिकार बँकांना प्राप्त होतो. त्यासाठी 2018 साली या बँकांनी लंडनच्या उच्च न्यायालयात विजय मल्ल्याविरोधात धाव घेतली होती. अखेर आपली बाजू पटवून देण्यात भारतीय बँकांना यश आलं असून मल्ल्याला मोठा झटका बसला आहे.

दरम्यान, लंडन हायकोर्टाच्या या निर्णय़ाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं विजय मल्ल्यानं म्हटलं होतं. मात्र त्याला तशी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे लंडनच्या उच्च न्यायालयाचा हा फैसलाच अंतिम राहणार असून बँकांना वसुली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे वाचा -मालक आणि मुलाला बसला विजेचा धक्का, पाळीव कुत्र्याने तोंडात तार धरून खेचली पण…

या बँकांचा समावेश

स्टेट बँक ऑफ इंडियासह 13 विविध बँकांचं कर्ज विजय मल्ल्यानं घेतलं होतं. त्यामध्ये बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, फेडरल बँक, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, जम्मू अँड काश्मीर बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ मैसूर, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, जेएम फायनान्शिअल यांचा समावेश आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#वजय #मललय #दवळखर #लडन #हयकरटच #फसल #भरतय #बकच #सरश

RELATED ARTICLES

तो बिर्याणी खातो आणि…; टीम इंडियाच्या गोलंदाजाबद्दल हे काय बोलून गेला Rohit sharma

रोहित शर्मा आता आगामी आशिया कपसाठी सज्ज झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

Most Popular

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित

Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)...