Saturday, November 27, 2021
Home क्रीडा विजय तुझ्या डोक्यात जात नाही आणि पराभव...; PM मोदींनी शेअर केला व्हिडिओ

विजय तुझ्या डोक्यात जात नाही आणि पराभव…; PM मोदींनी शेअर केला व्हिडिओ


नवी दिल्ली : १५ ऑगस्ट रोजी भारताच्या ७५ वा स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्व सहभागी खेळाडूंना लाल किल्ल्यावर ध्वजारोहण समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची भेट घेतली. यावेळी सर्व खेळाडूंनी पंतप्रधान निवासस्थानी अल्पोपहाराचा आनंद लुटला.

वाचा- लॉर्ड्सवरील पराभवानंतर इंग्लंडला मोठा झटका; तिसऱ्या कसोटीत पराभवाचे संकट

या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी सर्व सहभागी झालेल्या खेळाडूंची स्वत: चौकशी करत त्यांचे मनोबल वाढवले. टोकियो ऑलिम्पिकमधील खेळाडूंचे अनुभव काय आहेत, ते जाणून घेतले तसेच त्यांच्या फिटनेसबाबतही चर्चा केली. खेळाडूंशी संवाद साधतानाचा एक व्हिडिओ स्वत: मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.

वाचा- टी-२० वर्ल्डकप पाकिस्तानच्या कर्णधारचे विराट आणि भारताला आव्हान, पाहा काय म्हणाला…

स्वातंत्र्यदिनीच मोदींनी खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी देशभरातील नागरिकांनी पुढे येऊन टाळ्या वाजविण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी खेळाडूंसोबत स्नेहभोजनाचा आनंद लुटण्याचे ठरवले. टोकियो ऑलिम्पिकमधील पदक विजेत्या खेळाडूंचे त्यांनी कौतुक केले, तर ज्यांना पदक जिंकता आलं नाही, त्या सर्व खेळाडूंचे त्यांनी मनोबलही वाढवलं.

वाचा- ICCकडून टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी होणार भारताच्या लढती

व्हिडिओ शेअर करताना मोदींनी म्हटलं आहे की, ‘आइस क्रीम आणि चुरमा खाण्यापासून ते उत्तम आरोग्य आणि फिटनेसवर चर्चा करण्यापर्यंत, प्रेरक गोष्टी ते हलक्या-फुलक्या क्षणांपर्यंत… जेव्हा मला भारताच्या टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये सहभागी झालेल्या पथकासोबत मेजवानीचे आयोजन करण्याची संधी मिळाली, तेव्हा काय झाले ते पाहा.”

यावेळी पंतप्रधानांनी बजरंगच्या गुडघ्याला झालेली दुखापत, लवलिनाची आई, श्रीजेश जेव्हा हॉकी गोलपोस्टवर चढला आणि नीरजने दुसऱ्या फेकीनंतर साजरा केलेला आनंद याबाबतही चर्चा केली. तसेच रविकुमारने शेवटच्या मिनिटात सामना फिरवून अंतिम फेरी गाठली आणि महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल आणि तिच्या सहकाऱ्यांनी केलेली जिगरबाज खेळी याचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.

वाचा- कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षात इंग्लंडची अशी अवस्था कोणीच केली नव्हती; पाहा टीम इंडियाचा पराक्रम

नीरज आणि सिंधूला दिलेलं आश्वासन केलं पूर्ण
जेव्हा नीरज चोप्रा टोकियोहून मायदेशी परतला, तेव्हा केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्याला वचन दिले होते की, पंतप्रधान मोदी त्यांना चुरमा खाऊ घालतील. तसेच पंतप्रधान मोदींनीही पी.व्ही. सिंधूला ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी वचन दिले होते की, जेव्हा ती टोकियोहून पदक जिंकून भारतात परत येईल, तेव्हा तिच्यासोबत आईस्क्रीम खाईन. ही दोन्ही आश्वासने मोदींनी पूर्ण केली.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#वजय #तझय #डकयत #जत #नह #आण #परभव #मदन #शअर #कल #वहडओ

RELATED ARTICLES

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 27 नोव्हेंबर 2021 : शनिवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा...

Most Popular

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....

जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल

मुंबई : Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जिऱ्याच्या पाण्याचे...

ST Strike Live : बहुतांश एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम, काही ठिकाणी सेवा सुरु,वाचा प्रत्येक अपडेट

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन राज्यात बहुतांश ठिकाणी अजूनही सुरुच आहे. कोल्हापूर जिल्हा आणि अन्य काही ठिकाणी संरक्षणात एसटी सेवा सुरु केली...

स्वत:ची Car घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाहन कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : बहुतांश सर्वसामान्य लोकांची दोन स्वप्नं (Dreams) असतात. स्वतःच्या मालकीचं घर घेणं (Own House) आणि कार (car) घेणं. कार...

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश

मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...

Box Office Report: बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; ‘बंटी और बबली 2’ ची निराशा

Box Office Report :   चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर सर्व सिनेमा प्रेमींनी थिएटर्सकडे धाव घेतली. अभिनेता अक्षय कुमारचा  (Akshay Kumar)...