Saturday, November 27, 2021
Home क्रीडा विजयानंतर भारतीय संघाने ड्रेंसिंग रुममध्ये कसे केले सेलिब्रेशन, समोर आले आता भन्नाट...

विजयानंतर भारतीय संघाने ड्रेंसिंग रुममध्ये कसे केले सेलिब्रेशन, समोर आले आता भन्नाट व्हिडीओ…


लंडन : भारताने लॉर्ड्सच्या मैदाात ऐतिहासिक विजय साकारला. भारतीय संघाने या विजयाचे सेलिब्रेशन कसे केले, याचे काही व्हिडीओ आता समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये सेलिब्रेशन करताना भारताच्या खेळाडूंनी नेमकं काय केलं आहे, ते आता सर्वांना पाहायला मिळत आहे.

भारतीय संघ दुसरा सामना जिंकेल, असे पाचव्या दिवशी सकाळी कोणालाही वाटत नव्हते. कारण त्यावेळी भारताची नाजूक अवस्था होती. कारण भारताचा फलंदाज रिषभ पंत हा लवकर बाद झाला होता आणि त्यावेळी भारताला २०० धावाही पूर्ण करता आल्या नव्हत्या. त्यावेळी भारतीय संघ हा सामना पराभूत होऊ शकतो, असे काही जणांनी म्हटले होते. पण त्यानंतर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा या तळाच्या फलंदाजांनी कमाल केली. या दोघांनी नवव्या विकेटसाठी रचलेल्या ८९ धावांच्या जोरावर भारताने विजयाचे स्वप्न पाहिले. भारताने यावेळी इंग्लंडला विजयासाठी २७२ धावांचे आव्हान दिले होते. पण भारताच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत इंग्लंडचा डाव १२० धावांत आटोपला आणि संघाला १५१ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. त्यानंतर भारतीय संघाने दणक्यात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. या सेलिब्रेशनचे व्हिडीओ आता चांगलेच व्हायरल झाले आहेत.

इशांत शर्माला बाद केल्यावर जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांनी जिद्दीने फलंदाजी करत खेळपट्टीवर बराच वेळ तग धरला. जे रोहित शर्मा, विराट कोहली यांना करता आलं नाही ते यावेळी शमीने करून दाखवलं. कारण शमीने यावेळी झुंजार अर्धशतक झळकावत इंग्लंडला चोख उत्तर दिलं. शमी आणि बुमरा यांनी यावेळी नवव्या विकेटसाठी ८९ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. शमीने यावेळी सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५६ धावांची खेळी साकारली. बुमरानेही यावेळी शमीला चांगली साथ दिली, बुमराने तीन चौकारांच्या जोरावर नाबाद ३६ धावा केल्या. लंचच्यावेळी भारताने यावेळी ८ बाद २९८ या धावसंख्येवर आपाल डाव घोषित केला आणि इंग्लंडला २७२ धावांचे आव्हान दिले. आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची २ बाद १ धाव अशी दयनीय अवस्था केली होती. त्यानंतर काही काळ इंग्लंडता कर्णधार जो रुट हा खेळपट्टीवर ठाण मांडून होता, पण यावेळी बुमराने रुटला विराट कोहलीकरवी झेलबाद केले आणि भारताला मोठे यश मिळाले. इंग्लंडची ५ बाद ६७ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मोहम्मद सिराजने आपल्या एकाच षटकात इंग्लंडच्या दोन फलंदाजांना बाद केले आणि हा सामना भारत जिंकणार, हे निश्चित झाले होते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#वजयनतर #भरतय #सघन #डरसग #रममधय #कस #कल #सलबरशन #समर #आल #आत #भननट #वहडओ

RELATED ARTICLES

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Most Popular

जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल

मुंबई : Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जिऱ्याच्या पाण्याचे...

IPL 2022 Mega Auction: कोण होणार नव्या अहमदाबाद टीमचा कर्णधार?

नव्या अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 5 नावं प्रामुख्याने समोर आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

प्रशांत किशोर यांच्या बंगळुरू भेटीची चर्चा; दक्षिणेत कुणासाठी सुरू मोर्चेबांधणी?

शरद शर्मा कलागारू बंगळुरू, 26 नोव्हेंबर: राजकीय रणनीतिकार (Political strategist) म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नुकतीच कर्नाटकमधल्या (karnataka) काही कॉंग्रेस नेत्यांची...

Box Office Report: बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; ‘बंटी और बबली 2’ ची निराशा

Box Office Report :   चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर सर्व सिनेमा प्रेमींनी थिएटर्सकडे धाव घेतली. अभिनेता अक्षय कुमारचा  (Akshay Kumar)...

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...