Friday, May 20, 2022
Home मुख्य बातम्या 'विकृतीला वेळीच आवर घाला', राज ठाकरेंकडून केतकी चितळेच्या पोस्टवर निषेध व्यक्त

‘विकृतीला वेळीच आवर घाला’, राज ठाकरेंकडून केतकी चितळेच्या पोस्टवर निषेध व्यक्त


मुंबई, 14 मे : अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर फेसबुकवर अतिशय खालच्या पातळीवर टीका करणारी पोस्ट केली आहे. तिच्या या टीकेवर राज्यभरातून निषेध व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी देखील केतकी चितळेने केलेल्या पोस्टवर आपली भूमिका मांडली आहे. केतकी चितळेची पोस्ट म्हणजे विकृती आहे. या विकृतीला वेळीच आवर घालायाला पाहिजे, असं मत राज ठाकरे यांनी ट्विटरवर व्यक्त केलं आहे. शरद पवरांसोबत आमचे मतभेद जरुर आहेत. पण ते वैचारिक मतभेद आहेत. केतकी चितळेने केलेल्या पोस्ट सारखं घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

“महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुद्ध तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत.! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरुर आणि आहेत आणि राहतील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे इथे स्पष्टपणे सांगणे गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे”, असं राज ठाकरे रोखठोकपणे म्हणाले.

(“चोप दिल्याशिवाय शांत बसणार नाही” केतकी चितळेच्या FB पोस्ट नंतर राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका)

“चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतांनी आपल्याला शिकवलं! कोणीही या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा”, असं ते म्हणाले.

“पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती या खरंच आहेत की नवा वाद उकरुन काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरु आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे. कारण या अशाच चार-दोन विकृत टोळक्यांमुळे समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यानाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गजेचं आहे. कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्य सरकारने याचा नीट छडा लावून या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा”, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

तुमच्या शहरातून (मुंबई)

  • 'शरद पवारांसोबत आमचे मतभेद जरुरु, पण विकृतीला वेळीच आवर घाला', राज ठाकरेंकडून निषेध व्यक्त

    ‘शरद पवारांसोबत आमचे मतभेद जरुरु, पण विकृतीला वेळीच आवर घाला’, राज ठाकरेंकडून निषेध व्यक्त

  • महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज ठाकरेंसाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण....

    महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज ठाकरेंसाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण….

  • Uddhav Thackeray: मुंबईतील सभेनंतर उद्धव ठाकरे संपुर्ण महाराष्ट्रात सभा घेणार, शिवसेनेने आखला मेगा प्लान

    Uddhav Thackeray: मुंबईतील सभेनंतर उद्धव ठाकरे संपुर्ण महाराष्ट्रात सभा घेणार, शिवसेनेने आखला मेगा प्लान

  • Terror Funding Case : दाऊद इब्राहिम, छोटा शकीलच्या काळ्या धंद्यांचे हस्तक, आरोपींनी कोर्टात गायलं देशभक्ती गीत

    Terror Funding Case : दाऊद इब्राहिम, छोटा शकीलच्या काळ्या धंद्यांचे हस्तक, आरोपींनी कोर्टात गायलं देशभक्ती गीत

  • Weather Update: उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारा ; पण आपल्याच राज्यात या गावात स्वेटर चढवण्याएवढा गारठा

    Weather Update: उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारा ; पण आपल्याच राज्यात या गावात स्वेटर चढवण्याएवढा गारठा

  • Shiv Sena Rally: "बुस्टर डोस कुणाचा माहिती नाही पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असणार" - संजय राऊत

    Shiv Sena Rally: “बुस्टर डोस कुणाचा माहिती नाही पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असणार” – संजय राऊत

  • Exclusive : डी गॅंगच्या टार्गेटवर हिंदुत्ववादी राजकीय नेते, मोठा घातपात घडवण्याचा कट, NIAच्या तपासात मोठा खुलासा

    Exclusive : डी गॅंगच्या टार्गेटवर हिंदुत्ववादी राजकीय नेते, मोठा घातपात घडवण्याचा कट, NIAच्या तपासात मोठा खुलासा

  • यशवंत जाधव यांचा आणखी एक प्रताप उघड, संपत्तीची संख्या 36 वरून पोहोचली 53 वर

    यशवंत जाधव यांचा आणखी एक प्रताप उघड, संपत्तीची संख्या 36 वरून पोहोचली 53 वर

  • "पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..." नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

    “पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर…” नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

  • महागाईचा भडका, आता PUC चाचणीचा दर वाढला, दुचाकींसाठी 50 ते चार चाकींसाठी 150 रुपये मोजा

    महागाईचा भडका, आता PUC चाचणीचा दर वाढला, दुचाकींसाठी 50 ते चार चाकींसाठी 150 रुपये मोजा

  • आजच्या सभेत उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे देणार का? नितेश राणेंचा सवाल

    आजच्या सभेत उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे देणार का? नितेश राणेंचा सवाल

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.





अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#वकतल #वळच #आवर #घल #रज #ठकरकडन #कतक #चतळचय #पसटवर #नषध #वयकत

RELATED ARTICLES

25 वेळा नापास; वयाच्या 55 व्या वर्षी 26 व्या वेळी देणार ‘हा’ व्यक्ती परीक्षा

चीन, 20 मे: स्वप्न (Dream) तीच असतात जी कधीही व्यक्तिला स्वस्थ बसू नाही देत. चीनमध्ये अशाच एका स्वप्नवेड्या माणसाची कहाणी समोर आली आहे....

ड्रेसिंग रूममधील आदळ आपट Mathew Wade ला महागात, मिळाली चुकीची शिक्षा

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) गुरूवारचा दिवस निराशाजनक ठरला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं गुजरातचा 8...

Sambhajiraje Chhatrapati : शिवसेनेकडून राज्यसभा लढवण्याची संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांची ऑफर

<p>Sambhajiraje Chhatrapati : शिवसेनेकडून राज्यसभा लढवण्याची संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांची ऑफर</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

अजय-अतुलमुळे झाला होता ‘पुष्पा’फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू

मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अत्यंत गोड आणि...

Monkeypox Outbreaks : आफ्रिकेत ‘मंकीपॉक्स’चा उद्रेक! नवीन रोगामुळे शास्त्रज्ञांसमोर आव्हान

Monkeypox Outbreaks : गेल्या दोन वर्षांपासून, संपूर्ण जग आधीच कोरोना (Corona) महामारीने हैराण झाले आहे आणि लाखो लोकांना...

Oppo Smartphones: लवकरच लाँच होणार Oppo Reno 8 Series चे तीन स्मार्टफोन्स, ५० MP कॅमेरासह मिळतील हे फीचर्स

नवी दिल्ली : Upcoming Oppo Smartphones: Oppo आपली आगामी Reno 8 स्मार्टफोन सीरीज २३ मे रोजी चीनमध्ये लाँच करणार असून रिपोर्ट्सनुसार, आगामी फ्लॅगशिप...

संभाजीराजे महाविकास आघाडीकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार? मुख्यमंत्री संभाजीराजे यांच्यात चर्चा

Sambhaji Raje  meets cm Uddhav Thackeray : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर...

तलावाचा वापर न करता मत्सपालन करा तेही वर्षाला पाचपट फायद्यासह, जाणून घ्या पद्धत

मुरादाबाद, 19 मे : उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला परिसरात एका शेतकऱ्यांने मत्सपालनातून (Fish farming) विक्रमी उत्पादन घेतले आहे. माझोला या...

IPL: अंपायरच्या एका चुकीमुळे KKR प्ले-ऑफमधून बाहेर! रिंकूच्या विकेटमुळे नवा वाद

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. प्ले-ऑफमध्ये आतापर्यंत दोन टीम पोहोचल्या आहेत, तर काही टीम...