घरात नेहमी अशांतता असते, पैसा टिकत नाही, नकारात्मक वातावरण असतं, अशी तक्रार अनेक जण नेहमी करताना दिसतात. वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगितले गेले आहेत. योग्य दिशेला फुलझाडं किंवा वनस्पतीची लागवड केल्यास या समस्या दूर होऊ शकतात. जास्वंदीचं लाल फूल म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येते ती श्री गणेशाची (Shri Ganesh) मूर्ती. कारण गणपतीला हे फूल विशेष प्रिय आहे. वास्तुशास्त्रात या फुलास विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर (North) किंवा पूर्व दिशेला (East) जास्वंदीचं झाड लावल्याने घरातलं वातावरण चांगलं राहतं. जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही.
वाचा – पालकांनी वेळीच सावध व्हा; इतक्या कमी वयातच मुलांमध्ये दिसतात कॅन्सर, डायबिटीजची लक्षणं
सूर्यप्रकाशासाठी हे झाड तुम्ही घरातल्या खिडकीजवळही लावू शकता. याव्यतिरिक्त, घरात हे झाड लावण्याचे अनेक फायदे आहेत. तसंच लाल फुलांमुळे घराचं सौंदर्य अधिकच खुलतं.
धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फूल शुभ मानलं गेलं आहे. हे फूल कालिमाता आणि श्रीगणपतीला अर्पण केलं जातं. जास्वंदीचं फूल सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. रोजच्या पूजेसाठीदेखील या फुलाचा वापर होतो. मंगळवारी श्री हनुमानाला (Hanuman) जास्वंदीचं फूल अर्पण करणं चांगलं मानलं जातं. सूर्यदेवाची उपासना आणि पूजाविधीतही लाल जास्वंद फुलाचा वापर केला जातो.
धर्मशास्त्र, तसंच वास्तुशास्त्र या दोन्ही शास्त्रांमध्ये जास्वंदीचं झाड शुभ मानलं गेलं आहे. घरात नकारात्मकता आणि समस्या जाणवत असतील, पैसा टिकत नसेल, तसंच अशांतता असेल तर वास्तुशास्त्र अभ्यासकांच्या सल्ल्यानं जास्वंदाचं झाड घरामध्ये लावण्यास काहीच हरकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#वसतशसतरनसर #घरत #जसवदच #झड #लवणयच #आहत #फयद #पण #दश #महततवच