Saturday, August 13, 2022
Home विश्व वातावरणातील विषारी घटकांमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम!; संशोधनात दावा

वातावरणातील विषारी घटकांमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम!; संशोधनात दावा


वॉशिंग्टन: मागील काही दशकांमध्ये पुरुषांच्या प्रजनन क्षमतेत वेगाने घट झाली असल्याची बाब एका संशोधनातून समोर आली आहे. पुरुषांमधील कमी झालेल्या प्रजनन क्षमतेबाबतच्या कारणासाठी ठोस कारण समोर आले नसले तरी वातावरणातील विषारी घटकांचा परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अनेक कारणांपैकी हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेमध्ये दर आठपैकी एक जोडपे संततीधारणेसाठी असमर्थ आहे. डॉक्टरांना ३० ते ५० टक्के पुरुषांमधील प्रजनन क्षमता नेमकी कशी कमी झाली याबाबतचे काहीही कारण समजले नाही. मात्र, बहुतांशी दाम्पत्यांना त्यांच्या कामाचे स्वरुप, फोन-लॅपटॉपचा वापर आदी प्रश्न विचारण्यात आले होते. या संशोधनातील महत्त्वाचे संशोधक डॉ. नाइल्स स्काक्केबेक यांनी सांगितले की, हा आपल्यासाठी धोक्याचा इशाराा असल्याचे समजण्यास हरकत नाही. जागतिक पातळीवर प्रजनन आरोग्याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. मी टॉक्सिकोलॉजिस्ट नसल्याने नेमका कोणता घटक विषारी आहे, हे सांगता येणार नाही. मात्र, भविष्याच्या दृष्टीने मानवातील बदलाची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

वाचा:अमेरिका: मोठ्या प्रमाणावर लसीकरण, तरीही ‘या’ कारणाने बाधितांच्या संख्येत वाढ

पुरुषांमधील वीर्याचे विश्लेषण

पुरुषांमधील प्रजनन क्षमतेच्या मुल्यांकनाचा आधार वीर्य विश्लेषण असत. वीर्यात असणाऱ्या शुक्राणूंच्या संख्या मोजली जाते. त्याआधारे पुरुषाकडे प्रजननासाठी आवश्यक शुक्राणू आहेत का हे पाहिले जाते. शुक्राणूंची संख्या कमी असल्यास औषधोपचार केले जातात.

प्रजनन क्षमता कमी होण्याची कारणे

पुरुषांमधील प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारे इतर घटकही कारणीभूत आहेत. यामध्ये लठ्ठपणापासून ते हार्मोनचे असंतुलन असणे, अनुवांशिक आजार असणे आदी कारणांमुळे प्रजनन क्षमता प्रभावित होऊ शकते. मात्र, अनेक जोखिमांवर नियंत्रण ठेवूनही पुरुषांमधील प्रजनन क्षमतेवर मागील काही दशकांमध्ये परिणाम झाला असल्याचे संशोधकांना आढळले.

हवामान बदलाचा परिणाम; अडीच कोटी लोकसंख्येचे ‘हे’ शहर नष्ट होणार?

शुक्राणूंच्या संख्येत कमतरता

अनेक संशोधनातून समोर आले की, आज पुरुषांमध्ये पूर्वीच्या तुलनेत सध्या शुक्राणूंची संख्या कमी झाली आहे. वर्ष २०१७ च्या संशोधनात शुक्राणूंचे प्रति मिलीमधील संख्येत ५० ते ६० टक्के घट झाली आहे. तर, वर्ष २०१९ मध्येगतिशील शुक्राणूंच्या एकूण संख्या पाहण्यात आली. या संशोधनानुसार, १६ वर्षांमध्ये सामान्य गतिशील शुक्राणू असलेल्या पुरुषांच्या प्रमाणात १० टक्के घट झाली आहे.

पर्यावरणातील विषारी घटकांच्या संपर्कात आल्यानंतर हार्मोनवर परिणाम होतो आणि प्रजनन क्षमता कमी होते. वातावरणातील विषारी घटकांचा किती व कसा परिणाम होतो, याबाबत संशोधन सुरू आहे. मात्र, कोणत्या घटकामुळे परिणाम होतो, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आली नाही.

पाहा: तुर्कीतील जंगलातील आग मानवी वस्तीत; ५० जण जखमी
प्लास्टिकच्या पाण्याची बाटली, जेवणाच्या डब्यातून येणारा प्लास्टिसायझर पुरुष हार्मोन टेस्टोस्टेरोन आणि वीर्य क्षमतेवर परिणाम करतो. या धोकादायक रसायनांमध्ये कीटकनाशके, तणनाशक, जड धातू, विषारी वायू आणि इतर कृत्रिम पदार्थांचा समावेश आहे. सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड देखील शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. लॅपटॉप, मॉडम, मोबाईलमधून निघणारे किरणोत्सर्गही शुक्राणूंची संख्या कमी होण्याशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#वतवरणतल #वषर #घटकमळ #परषचय #परजनन #कषमतवर #परणम #सशधनत #दव

RELATED ARTICLES

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Most Popular

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात प्रेक्षकांना मिळणार अष्टविनायकाची माहिती

मुंबई, 12 ऑगस्ट : स्टार प्रवाह सध्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी वाहिनी आहे. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांची मन जिंकत आहेत.  टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या...

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

<!-- --><!-- -->Auspicious day for gold shopping, which is the auspicious day to buy gold and which day to Avoid mhpj...