Sunday, January 16, 2022
Home भारत वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी

वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी


राजस्थान, 27 नोव्हेंबर: राजस्थानची (Rajasthan)राजधानी जयपूर (Jaipur) ग्रामीणमधील पावटा भागात गुरुवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. दगडफेकीचे कारण दलित वर घोड्यावर बसल्याचं सांगितलं जात आहे. दलित वराच्या मिरवणुकीवर कथित दगडफेकीनंतर पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे.

या घटनेत 12 जण जखमी झाले असून, पोलीस संरक्षणातही लग्नाच्या वरातीच रक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेसच्या स्थानिक आमदाराने प्रागपुरा पोलीस ठाण्याच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना निलंबित (Suspend) करण्याची मागणी केली आहे.

ही घटना कोटपूतली परिसरातील पावटा ग्रामपंचायतीच्या किरोरी की ढाणी गावातील आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका समाजातील काही खोडकर लोकांनी एका दलित व्यक्तीनं घोड्यावर बसून लग्न करण्यावर आक्षेप घेतला होता. त्याचवेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी लग्नापूर्वी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. मात्र वरातीत काही लोकांनी जमावावर दगडफेक केली.

पोलिसांनी 10 जणांविरुद्ध दाखल केला गुन्हा

पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दिलेल्या तक्रारीत वराच्या कुटुंबीयांनी 20 जणांची नावे दिली असून त्यापैकी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याच वेळी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एससी/एसटी (अत्याचार प्रतिबंधक) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

तक्रारीत नाव असलेल्या अन्य 10 जणांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे राजपूत समाजातील होते.

पोलिसांचा दावा – मिरवणुकीला पूर्ण सुरक्षा दिलं होतं

या प्रकरणी पोलिसांनी म्हटलं की, कैरोडीच्या धानी ग्रामपंचायतीत मिरवणुकीला सुरक्षा पुरवण्यात आली होती. कारण वधूच्या कुटुंबाला त्रास झाला होता. मात्र, ही मिरवणूक एका उच्चवर्णीय वस्तीतून जात असताना काही लोकांनी त्यावर दगडफेक केली, असे पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

हेही वाचा- मुंबई विमानतळावर DRI ची मोठी कारवाई, कोट्यवधी विदेशी चलनासह दोघांना अटक

पोलिसांचे म्हणणे आहे की, एसडीएम आणि पोलिसांसह स्थानिक प्रशासनाने विविध समुदायातील लोकांची बैठक घेतली आणि त्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सांगितलं. एसएचओ म्हणाले की, सर्वांनी सहकार्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र तरीही ही दगडफेकीची घटना घडली.

वधूपक्षाच्या नातेवाईकांनी पत्र लिहून सुरक्षिततेची केली होती विनंती

यावेळी वधू पक्षाचे नातेवाईक नितेंद्र मानव यांनी हे पोलिसांचे सर्वात मोठे अपयश असल्याचा दावा केला. कारण आधी माहिती देऊनही आणि पोलिसांच्या उपस्थितीत ही घटना घडली. त्याचवेळी मानव यांनी सांगितले की, वर हा सरकारी शिक्षक आहे. त्यांनी घोड्यावर बसून वरातीत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. या प्रकरणाबाबत वधूच्या वडिलांनी राजस्थानचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि स्थानिक प्रशासनाला पत्र लिहून कोणतीही अनुचित घटना घडल्यास संरक्षण देण्याची मागणी केली होती.

पोलीस ठाण्यातील संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी

विशेष म्हणजे याच दरम्यान काँग्रेसचे आमदार खिलाडी लाल बैरवा यांनी पोलीस ठाण्यातील संपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लग्नाच्या 15 दिवस आधी पोलिसांना कळवूनही हा प्रकार घडला असून पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावं असे त्यांनी म्हटलं आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#वईट #दलत #नवरदव #घडयवर #बसल #महणन #कल #दगडफक #जण #जखम

RELATED ARTICLES

लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

मुंबई, 16 जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संबंधित घटनेबाबतची बातमी...

जगभरात लोकांनी 365 दिवसात मोबाईलवर घालवले 43 कोटी वर्ष; भारतीय देखील मागे नाहीत

मुंबई, 16 जानेवारी : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कोरोना काळात जणू आपलं सगळं जगच मोबाईलवर एकवटलं आहे. जगभरात लोक...

‘ कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची…’ किरण मानेंचा निर्मात्यांवर गंभीर आरोप

मुंबई,16 जानेवारी-  गेल्या दोन दिवसांपासून अभिनेते किरण माने   (Kiran Mane)  प्रचंड चर्चेत आहेत. राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला 'मुलगी झाली हो'   (Mulgi Zali...

Most Popular

मुंबईकरांनो, तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक; कुठे अन् किती वाजेपर्यंत असणार मेगाब्लॉक?

Mumbai Local Mega Block News : रविवारच्या सुट्टीनिमित्त तुम्ही काही प्लॅन आखले असतील तर तुमचा खोळंबा होण्याची शक्यता...

विराटचा ‘हा’ निर्णय वैयक्तिक; कर्णधारपद सोडल्यानंतर सौरव गांगुली म्हणाले…

मुंबई : विराट कोहलीने कसोटी कर्णधार म्हणून आपली कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे. विराटच्या या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. विराट कोहलीने शनिवारी...

वांगी अगदी आवडीनं खाताय ना? मग या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात

मुंबई, 16 जानेवारी : अनेकांना वांगी खायला खूप आवडतात. विशेषत: वांग्याचं भरीत आणि भरलेली वांगी भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी आणतात. वांग्याची भाजी खाणारे शौकीन लोक...

‘रंजिश ही सही’….

‘‘ जेव्हा मी ही संहिता वाचली त्याचक्षणी माझ्या लक्षात आले की, माझ्यासाठी ही कथा समजायला फार अवघड नाही. || गायत्री हसबनीस ‘८३’ सिनेमाच्या...

Stock Marketमध्ये ट्रेडिंग करणं होईल सोपं,या Mobile Appवर मिळतील Investment Tips

नवी दिल्ली, 16 जानेवारी : कोरोना काळात शेअर मार्केटच्या मिनिटां-मिनिटाच्या बदलत्या ट्रेंडनंतरही गुंतवणुकदारांची तितकीशी निराशा झालेली नाही. त्याउलट विचार करुन, समजून केलेल्या गुंतवणुकीने...

Pune : पुण्यात MPSC करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती

By : abp majha web team | Updated : 16 Jan 2022 08:05 AM (IST) पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने विषप्राशन करुन आत्महत्या...