Monday, July 4, 2022
Home भारत लोकसभेत 127वी घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा, मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना मिळणार

लोकसभेत 127वी घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा, मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना मिळणार
नवी दिल्ली : लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं आहे. यावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. या घटनादुरुस्तीमुळे मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना मिळणार आहे. मागील आठवड्यात केंद्र सरकारने या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. या विधेयकाला विरोधकांनी पाठिंबा दिला आहे.

केंद्र सरकारने केलेल्या 102 व्या घटनादुरुस्तीमुळे मागासवर्ग निश्चितीचा अधिकार केंद्र सरकारकडे गेला होता. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या सुनावणीतही ही बाब अडचणीची ठरली होती. मात्र नव्या 127 व्या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारला मागासवर्ग निश्चितीचा अधिकार मिळेल.

इंद्र सहानी खटल्यातील निकालात सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा घालून दिली आहे. याबाबतही लवकरात लवकर निर्णय घेण्यात आला तर महाराष्ट्रातील मराठा, धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, महाराष्ट्रातील आरक्षणासाठी केंद्र सरकारने सोबत उभं राहावं, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेतील चर्चेत म्हटलं.

जेवणासाठी सोन्याचे ताट समोर ठेवले मात्र ते जर रिकामे असेल तर खायचे काय? असा सवाल उपस्थित करत 127 व्या घटना दुरुस्तीवर विनायक राऊत यांनी लोकसभेत परखड मत मांडलं. केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळेच मराठा आरक्षण रखडल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात मराठा, धनगर असे विविध समाज आहेत. राजस्थानामध्ये गुर्जर, हरियाणात जाट तर गुजरातमध्ये पटेल समाज आहे. या सर्व समाजाने आरक्षणासाठी मोठमोठी आंदोलने केली. यातील बहुतांश समाजांनी आपली आंदोलने ही लाठ्याकाठ्या घेऊन केली. मात्र महाराष्ट्रात मराठा, धनगर समाजाने अत्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलने केली. ही एक खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळ होती. इतर समाजांनीही त्यांचा आदर केला, असेही विनायक राऊत लोकसभेत म्हणाले.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#लकसभत #127व #घटनदरसत #वधयकवर #चरच #मगसवरग #नशचतच #अधकर #पनह #रजयन #मळणर

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच! खासदार विनायक राऊतांचा खुलासा

Shivajirao Adhalarao Patil : शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil...

आक्रमक स्वरुपात ‘कडक लक्ष्मी’ देवाकडे व्यथा करतेय व्यक्त

मुंबई : 'तुला ठाव नाही तुझी किंमत किती, चल दाखव या दुनियेला हिम्मत किती... ' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं ‘कडक लक्ष्मी’ (Kadaklakshmi) गाणं नुकताचं...

IND vs ENG : पावसामुळे सामना थांबला, आता किती वाजता सुरु होणार जाणून घ्या…

बर्मिंगहम : पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात पावसामुळे थांबवण्यात आला. त्यावेळी इंग्लंडची ६ बाद २०० अशी स्थिती झाली होती. त्यावेळी भारतीय...

“मला मराठीतील ‘या’ दिग्दर्शकासोबत काम करायचं”, ‘SHE’ वेबसीरीजमधील अभिनेत्रीचे वक्तव्य चर्चेत | Aaditi Pohankar talk about Marathi comeback wants to work with marathi director...

मराठी अभिनेत्री आदिती पोहनकर ही सध्या SHE या वेबसीरीजमुळे चर्चेत आली आहे. आदिती पोहनकरने या सीरिजमध्ये एका पोलिसाची भूमिका केली आहे. तिच्या SHE...

जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी ‘मूल्य’ विषयक नेतृत्वाकडं जाण्याची गरज : मनसुख मांडविया

Mansukh Mandaviya : जागतिक औषध बाजारपेठ काबीज करण्यासाठी आपण 'आकारमाना' वरुन 'मूल्य' विषयक नेतृत्वाकडे जाण्याची गरज असल्याचे मत...