पुढे अस्लम शेख म्हणाले की, लॉकडाऊन टप्या टप्याने शिथिल करणं योग्य ठरेल. जी परिस्थिती आता केरळमध्ये आली आहे. ती आपल्याडे येऊ नये यासाठी आपल्याला जपून पाऊल उचलावं लागेल.
परत कोरोना वाढता कामा नये, असंही ते म्हणालेत. त्यामुळे मॉल आणि रेस्टाँरंट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दोन लस पूर्ण केल्यास त्यांनाही काम करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेऊ, असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.
बापरे! पोटातून 18 कोटींची कोकेन तस्करी; मुंबई विमानतळावरून दोघांना अटक, NCB ची मोठी कारवाई
विरोधी पक्षांनी कितीही दबाव टाकला तरी तसं काही त्यांच्या मनाप्रमाणे होणार नाही. शाळा उघडण्याबाबत दोन्ही बाजू मांडल्या जातायत. टास्क फोर्सचेही मत योग्य आहे. अचानक केसेस वाढल्यास पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये, याची काळजी घ्यावी लागेल, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.
आम्हाला लस मिळत नाही म्हणून आम्ही लस उपलब्ध करू शकत नाही. केंद्र सरकारने आम्हाला लस मोठ्या प्रमाणात लस उपलब्धं करून दिली पाहिजे. त्यामुळे लोकांचे हाल होत असल्याचं ते म्हणालेत. केंद्र सरकार लस वितरणात दूजाभाव करत आहे. त्यामुळे राज्याला लस कमी मिळत आहे. हे आता सर्वांना माहित असल्याचं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. विरोधकांनी केंद्रावर दबाव टाकून राज्यासाठी अधिक लस मिळवून द्यावी. केंद्राकडून पुरेसा लस पुरवठा होत नसल्यानं कित्येकदा लसीकरण केंद्रे बंद करावी लागतायत, असंही ते म्हणालेत.
अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ, ईडीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे
राजीव गांधी यांनी देशात नवीन टेक्नॉलॉजी आणली. मात्र काही लोक जाणीवपूर्वक त्यांचं नाव काढत आहेत. त्यामुळं हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलाय. जेवढे ते नाव संपवण्याचा प्रयत्न करतील तेवढे त्यांचे नाव वरती येत राहील. नवीन योजना कुठलीही न आणता जुन्या योजनांची केवळ नाव बदलली जाताहेत. ज्यांनी आयुष्यात कधी बॅट पकडली नाही, त्यांची नावे स्टेडियमला दिली जातायत, अशी टीका अस्लम शेख यांनी केली.
Published by:Pooja Vichare
First published:
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#लकडऊन #शथल #करण #टपय #टपयन #यगय #ठरल #वरधकचय #मनपरमण #हणर #नह #असलम #शख #यच #वकतवय