जेरूसलेम: काही महिन्यांपूर्वी पॅलेस्टाइनमधील सशस्त्र गटासोबत संघर्ष झाल्यानंतर आता इस्रायलचा लेबनॉनसोबत संघर्ष सुरू होण्याची भीती आहे. लेबनॉनकडून तीन रॉकेट हल्ले करण्यात आल्याचा दावा इस्रायलने केला. या रॉकेट हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायली सैन्यानेही हल्ला केला असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लेबनॉनकडून हल्ला झाल्यानंतर उत्तर इस्रायलमध्ये धोक्याचा इशारा देणारे सायरन वाजू लागले.
लेबनॉनकडून डागण्यात आलेला रॉकेट हा इस्रायलमधील मोकळ्या जागेवर पडला असल्याचे वृ्त् स्थानिक माध्यमांनी दिले आहे. त्याशिवाय, लेबनॉनकडून आलेला एक रॉकेट इस्रायलच्या आयर्न डोमने रोखला. आयर्न डोम हा क्षेपणास्त्र हल्ला रोखण्यात मोठी भूमिका बजावतो. पॅलेस्टाइनमधील हमासने डागलेले अनेक रॉकेट हल्ले आयर्न डोमने निष्प्रभ केले होते. वाचा:हिंसाचारग्रस्त अफगाणिस्तानचे भारताला साकडं; केली ‘ही’ मागणी!
अफगाण सैन्य आणि तालिबानमध्ये तीन प्रांतात घनघोर संघर्ष; विमान सेवा बंद लेबनॉनच्या सीमाभागात काही पॅलेस्टिनी नागरीक वास्तव्य करत आहेत. मागील महिन्यातही इस्रायल आणि लेबनॉनमध्ये तणाव वाढला असल्याचे वृत्त समोर येत होते. लेबनॉनमधून झालेला हल्ला हा पॅलेस्टिनी नागरिकांनी केला असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर, इस्रायलच्या अधिकाऱ्यांनुसार या हल्ल्यात लेबनॉनमध्ये सक्रीय असलेल्या हिजबुल्लाहचा हात आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय पॅलेस्टाइनमधील कोणताही गट हल्ला करू शकत नसल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटले.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...
न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...
एपी, जीनिव्हा : यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित...
बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...
मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...
मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...
मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...