Saturday, July 2, 2022
Home विश्व लाहोर: नासधूस झालेल्या मंदिराची दुरुस्ती, हिंदूंकडे सोपवला ताबा

लाहोर: नासधूस झालेल्या मंदिराची दुरुस्ती, हिंदूंकडे सोपवला ताबा


लाहोर: शेकडोंच्या जमावाने नासधूस केलेल्या येथील एका मंदिराची पाकिस्तान सरकारने डागडुजी पूर्ण केली असून, ते पुन्हा हिंदूंकडे सुपूर्द करण्यात आले आहे. लाहोरपासून ५९० किलोमीटरवरील भोंग शहरातील या मंदिराची चार ऑगस्टला एका जमावाने तोडफोड केली होती. या मंदिराच्या विध्वंसाचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर भारताने; तसेच पाकिस्तानमधील हिंदूंनी तीव्र शब्दांत निषेध केला होता.

मुस्लिमांच्या प्रार्थनास्थळात लघुशंका केल्याच्या आरोपावरून अटकेत असणाऱ्या एका आठ वर्षीय हिंदू मुलाची स्थानिक न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. या निर्णयाचा निषेध म्हणून शेकडोंच्या जमावाने दगड-विटा, लाठ्यांच्या साह्याने या मंदिरावर हल्ला करून त्याची तोडफोड तसेच, जाळपोळ केली. या हल्ल्यात मंदिरातील मूर्तीचीही तोडफोड झाली. या प्रकरणी दीडशे हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील ९० जणांना अटक करण्यात आली आहे.

हिंदू मंदिरावर हल्ला; पाकिस्तानमधील विधानसभेत निषेधाचा ठराव
पाकिस्तानमध्ये धर्मांधांचा गणेश मंदिरावर हल्ला; हिंदू समुदायात संतापाची लाट
या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर पाकिस्तान सरकारने मंदिराच्या डागडुजीचे काम तातडीने हाती घेतले व पूर्ण केले. ‘या मंदिरात आता पूर्वीप्रमाणे धार्मिक विधीही करता येतील,’ असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या मंदिरावरील हल्ला रोखू न शकणाऱ्या प्रशासनाची पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केली होती.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील गणेश मंदिरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेध केला होता. या प्रकरणी दोषींवर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. पोलिसदेखील या प्रकरणात दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश इम्रान खान यांनी दिले होते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#लहर #नसधस #झललय #मदरच #दरसत #हदकड #सपवल #तब

RELATED ARTICLES

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Most Popular

पंत-जडेजाचा काऊंटर अटॅक; इंग्लंड गोलंदाजांना शिकवला चांगलाच धडा, असा केला पलटवार

मुंबई : इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन येथे सुरु झालेल्या पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवशी ७ बाद ३३८ धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ...

उदयपूर हत्या प्रकरण : हिंदू टेलरच्या हत्येनंतर गेहलोत सरकारने उचललं मोठं पाऊल

जयपूर 02 जुलै : प्रेषित पैगंबरांच्या कथित अपमानाच्या निषेधार्थ उदयपूरमधील एका हिंदू टेलरची गळा कापून हत्या करण्यात आली (Udaipur Tailor Murder Case). याप्रकरणी...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

IND vs ENG, 5th Test : कसोटी सामन्यावर पावसाचे सावट, दुसऱ्या दिवशी उशिराने मॅच सुरु होण्याची शक्यता

टीम इंडिया आणि इग्लंडमध्ये पाचवा आणि शेवटचा सामना एजबॅस्टनमध्ये खेळवला जात आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

‘टुटे मन से कोई खडा नही होता’ शिवसेनेचा फडणवीसांना वाजपेयींच्या कवितेतून टोला

  मुंबई,02 जून : '‘काळ्याचे पांढरे व पांढऱ्याचे काळे करणारे नवे युग आता तिथे अवतरले आहे. त्यामुळेच ‘छोटे मन’ आणि ‘मोठे मन’ यांच्या व्याख्या...

सत्तासंघर्षानंतर आता कुस्ती रंगणार! शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यानंतर आता त्याचे पडसाद क्रीडा क्षेत्रात देखील उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना...