Friday, May 20, 2022
Home लाईफस्टाईल लाल आणि गोड कलिंगड सहज ओळखू शकाल; खरेदी करताना होणार नाही फसगत

लाल आणि गोड कलिंगड सहज ओळखू शकाल; खरेदी करताना होणार नाही फसगत


मुंबई, 13 मे : उन्हाळी हंगाम सुरू असल्याने प्रत्येक घरात कलिंगड भरपूर खाल्ली जातात. कलिंगड शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते. हे फळ खाल्ल्याने शरीर आतून थंड राहते आणि अनेक प्रकारे आरोग्यालाही फायदा होतो. हे फळ चवीला गोड असते. काही लोकांना कलिंगड काळे मीठ किंवा हलकी साखर घालून खायला आवडते. टरबूजमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळतात, जे शरीराला उन्हाळ्यातील अनेक आजारांपासून (Summer Season Fruits) वाचवतात. मात्र, कलिंगड लाल आणि गोड असेल तरच खायला मजा येते. मात्र, बाजारातून आणलेले कलिंगड कापेपर्यंत आपल्याला खात्री नसते की ते लाल-गोड असेल की नाही. झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, लाल कलिंगड शोधून घेण्यासाठी काही टिप्स वापराव्या लागतात, त्याविषयी जाणून घेऊया.

गोड आणि लाल टरबूज कसे ओळखावे?

हलकसं पिवळं झालेलं असतं –

बरेच लोक हिरवे कलिंगड विकत घेतात, तसं न करता जे कलिंगड हलकसं पिवळ्या रंगाचे झालेले असते, ते खरेदी करा. गोड आणि आतून लाल निघेल. टरबूजच्या तळाशी जितके अधिक पिवळे डाग असतील तितके टरबूज गोड असेल.

हलके वाजवून पाहा –

कलिंगड विकत घेताना एका हातात उचलून दुसऱ्या हाताने वाजवून पाहा. टरबूज गोड असेल तर ढक-ढक आवाज येईल, पण गोड नसेल तर आवाज येणार नाही.

फुटलेलं, कट झालेलं घेऊ नका –

टरबूज खरेदी करताना, कोठूनही छिद्र नाही किंवा ते कापलेलं किंवा फुटलेलं नाही याची खात्री करा. आजकाल, टरबूज लवकर वाढण्यासाठी त्याला हार्मोनल इंजेक्शन देतात ज्यामुळे आरोग्यास हानी पोहोचते.

हे वाचा – चेहऱ्याच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; तिळावरून असं कळतं व्यक्तिमत्व

वजन बघा –

कलिंगड जास्त जड आणि भरलेले वाटत असेल तर त्याची चव चांगली निघणार नाही. हातात घेतल्यानंतर आकाराने मोठं असलं तरी त्याप्रमाणात वजनानं हलकं वाटत असेल तर ते चवीला चांगलं असतं.

हेे वाचा – 16 मे रोजी आहे पहिलं चंद्रग्रहण, या 5 राशीच्या लोकांनी आतापासूनच राहा सावध

आकार पाहून घ्या –

अंडाकृती आकाराचे कलिंगड/ टरबूज बहुतेकदा गोडच असतात, असं दिसून आलं आहे. त्यामुळे वाकड्या-तिकड्या आकाराचे किंवा गोल कलिंगड घेण्यापेक्षा फक्त अंड्याच्या आकाराचेच कलिंगड कधीही खरेदी करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#लल #आण #गड #कलगड #सहज #ओळख #शकल #खरद #करतन #हणर #नह #फसगत

RELATED ARTICLES

अबब! जेठालालचा लुक करून मुलीच्या चेहऱ्याचं नेमकं काय झालं बघा!

मुंबई 19 मे: सब टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आजही घराघरात आवर्जून पाहिला जातो. यातील...

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

ज्याची भिती होती ते घडलंच; भारतात कोरोनाच्या सब-व्हेरिएंटचा सापडला पहिला रूग्ण

ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट सापडल्याने पुन्हा नवं संकट उभं राहिलं आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Most Popular

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

संभाजीराजे महाविकास आघाडीकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार? मुख्यमंत्री संभाजीराजे यांच्यात चर्चा

Sambhaji Raje  meets cm Uddhav Thackeray : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर...

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

Upcoming Phones: पुढील महिन्यात भारतात एंट्री करणार Realme चा ‘हा’ पॉवरफुल स्मार्टफोन, फीचर्स एकदा पाहाच

नवी दिल्ली : Realme GT Neo 3T To Debut in India : Realme लवकरच आपल्या नवीन दमदार स्मार्टफोनला भारतीय बाजारात लाँच करण्याची शक्यता...

काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांवर वंचित बहुजन आघाडीने म्हटलं..

मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित...