बेन स्टोक्स 33 रनवर असताना लाबुशेनचा बाऊन्सर स्टोक्सच्या शरिरावर आपटला, यानंतर स्टोक्स मैदानातच कोसळला. सुदैवाने स्टोक्सला दुखापत झाली नाही आणि थोडा वेळाने तो परत बॅटिंगसाठी उभा राहिला. 110 बॉलमध्ये त्याने 82 रन केले, यात 8 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता.
Man down 😬
Ben Stokes is floored after inside edging a Labuschagne short ball into the unmentionables#LVCountyChamp pic.twitter.com/0y3bAxCIBo
— LV= Insurance County Championship (@CountyChamp) May 12, 2022
न्यूझीलंडविरुद्ध सीरिज
इंग्लंड पुढच्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध (England vs New Zealand) 3 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. पहिली टेस्ट 2 जूनपासून लॉर्ड्सवर सुरू होणार आहे. ही मॅच स्टोक्सची कर्णधार म्हणून पहिलीच टेस्ट असेल. ऍशेसमधल्या खराब कामगिरीनंतर जो रूटने कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. तसंच आता इंग्लंडला ब्रेण्डन मॅक्कलमच्या रुपात नवा कोचही मिळाला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातही एक टेस्ट होणार आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे भारताच्या इंग्लंड दौऱ्यातली पाचवी टेस्ट होऊ शकली नव्हती. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. स्टोक्ससोबतच चेतेश्वर पुजाराही (Cheteshwar Pujara) काऊंटी क्रिकेट खेळत आहे. पुजाराने 4 मॅचमध्ये 4 शतकं केली आहेत, या 2 द्विशतकांचाही समावेश आहे. या फॉर्ममुळे पुजाराने पुन्हा टीम इंडियात कमबॅकचा दावा ठोकला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#लबशनच #बल #पटवर #आदळल #Ben #Stokes #मदनतच #कसळल #VIDEO