Saturday, May 21, 2022
Home भारत लातूर जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप करा, अमित देशमुखांचे कारखाना व्यवस्थापनाला निर्देश

लातूर जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप करा, अमित देशमुखांचे कारखाना व्यवस्थापनाला निर्देश


Sugarcane News : राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हंगाम संपत आला तरी अद्याप काही जिल्ह्यामध्ये ऊस शिल्लक आहे. विशेषत: मराठवाड्यात अनेक ठिकाणी ऊस कारखान्याला गेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. याच पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील  गाळपाअभावी शिल्लक राहिलेल्या ऊसाच्या संदर्भाने पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासन, साखर आयुक्तालय व सहकारी तसेच खाजगी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनासोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी मे अखेरपर्यंत कारखाने चालवून जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप करण्याचे निर्देश दिले आहेत. 

बैठकीत नेमकं काय झालं

1) सर्व साखर कारखान्यांनी जवळपासची गावे विभागून घेऊन जलद गाळपासाठीचे नियोजन करावे. 
2) सभासद व बिगस सभासद असा भेद न करता सर्वांचा ऊस गाळप व्हावा हे पहावे . 
3) सोलापूर व नांदेड जिल्ह्यातील बंद होत असलेल्या कारखान्यातील ऊस तोडणी यंत्रणा मागवून घ्यावी. 
4️) शेजारी जिल्ह्यात बंद होत असलेल्या कारखान्यातील हार्वेस्टरचे अधिगृहन करावे.
5️) लातूर जिल्हाधिकारी यांनी नांदेड व सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून तोडणी यंत्रणेच्या अधिगृहनाबाबत कार्यवाही करावी. 
6️) कारखान्याला होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणने अखंड वीजपूरवठा करावा. 
7️) जिल्ह्यात कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही असे सांगून शेतकऱ्यांना दिलासा दयावा. 
8️) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. 
9️) शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या अफवा पसरवल्या जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी.

असे निर्देश या बैठकीदरम्यान पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. सभासद व बिगस सभासद असा भेद न करता सर्वांचा ऊस गाळप व्हावा करण्यासाठी कारखान्याच्या व्यवस्थापणाने पाहावे असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 
दरम्यान, अधिक काळ कारखाने चालवल्यामुळे कारखान्याचे होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी शासनाच्या वतीने साखर उतारा घट अनुदान आणि ऊस वाहतुकीसाठी अनुदान दिले जाणार आहे. ऊस तोडणी यंत्रणा उपलब्ध करुन देण्यासाठी नांदेडमध्ये राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व सोलापूर जिल्ह्यातील आमदार बबनदादा शिंदे यांना आपण स्वतः विनंती करणार असल्याचे यावेळी अमित देशमुख यांनी सांगितले.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#लतर #जलहयतल #सपरण #उसच #गळप #कर #अमत #दशमखच #करखन #वयवसथपनल #नरदश

RELATED ARTICLES

IPL 2022 : दोन कारणांमुळे दिल्ली कॅपिटल्स अडचणीत, आता चूक झाली तर खेळ समाप्त

मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील साखळी फेरीचे सामने रविवारी संपणार आहेत. शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians...

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Most Popular

वडिलांच्या 60व्या वाढदिवशी अभिज्ञाने उडवली धम्माल, Instagram Reel व्हायरल

मुंबई, 20 मे: सोशल मीडिया विशेषतः इन्स्टाग्राम (Instagram) हे खूप लोकप्रिय अ‍ॅप आहे. कॉलेजच्या तरूण-तरूणींपासून ते नेते मंडळींपर्यंत सगळेजण ते वापरतात. आपल्या आयुष्यात...

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

पावसाचा कहर; वीज पडून 33 जणांचा मृत्यू, PM मोदींकडून शोक व्यक्त

पाटणा, 21 मे: बिहारमध्ये वादळी (storm) पावसाने (Heavy Rain) कहर केला. गुरुवारी बिहारमधील 16 जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज (Thunderstorms and Lightning) पडून 33...

Mumbai Ahmedabad Highway वर खाद्यतेलाचा टॅंकर उलटला, महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प

<p>Mumbai Ahmedabad Highway वर खाद्यतेलाचा टॅंकर उलटला, महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

iPhone Offers: आतापर्यंतची बेस्ट डील ! १,००० रुपयांत घरी न्या iPhone SE, सोबत, 12 Mini, 13 Mini वर सुद्धा जबरदस्त डिस्काउंट

नवी दिल्ली: Best iPhone Deal: तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन प्रेमी असाल, आणि जर Apple iPhones तुम्हाला विशेष आवडत असतील तर, ते खरेदी करण्याची एक...