Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल लहान मुलांचं मानसिक आरोग्य जपणं आहे एक आव्हान, 'या' उपायांनी मुलं राहतील...

लहान मुलांचं मानसिक आरोग्य जपणं आहे एक आव्हान, ‘या’ उपायांनी मुलं राहतील आनंदी


मुंबई, 23 जून : बदलत्या काळानुसार केवळ प्रौढच नाही तर लहान मुलांनाही मानसिक विकार होत आहेत. त्यांनाही विविध कारणांमुळे चिंता, तणाव, अस्वस्थता आणि नैराश्य जाणवते. लहान मुलांना दुःखी आणि तणावग्रस्त वाटण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे कौटुंबिक वातावरण. त्यामुळे मुलांना मानसिकदृष्ट्या निरोगी आणि कणखर बनवण्यासाठी (Child’s Mental Health) योग्य पालकत्व शैली (Parenting Tips) आणि सकारात्मक कौटुंबिक वातावरण अत्यंत महत्वाचे आहे. तुम्हालाही तुमच्या मुलांना आनंदी आणि मनोसोक्त हसताना पाहायचंय ? मग या सोप्या टिप्स (Dos and Don’ts With Your Child) फॉलो करा.

मुलांना आनंद देण्यासाठी हे करा…

मुलांशी मोकळेपणाने बोला
मुलं प्रामाणिक असतात आणि मोकळेपणाने बोलल्यास (Talk Openly) ते सहजपणे व्यक्त होतात. त्यांच्याशी संभाषण सुरू करा आणि त्यांना त्यांच्या दिवसाबद्दल आणि जीवनाबद्दल विचारा. त्यांना एखाद्या गोष्टीचा त्रास होत आहे का ते विचारा आणि नंतर त्यांनी हायलाइट केलेल्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा.

वाईट बातम्या आणि मोबाईल गेमपासून शक्य तितके दूर ठेवा
मोबाईल गेम्स आणि नकारात्मक बातम्यांमुळे तुमच्या मुलांच्या मनावर नकळत त्याचा वाईट परिणाम होत असतो (Keep Away Chidren From Bad News And Mobile Games) आणि त्यामुळे मुलं मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवतात. त्यांचे अवचेतन मन नकारात्मक गोष्टी ग्रहण करते आणि त्यांना केवळ त्याच सर्व गोष्टींचा विचार करायला लावते. त्यामुळे मुलं सकारात्मक गोष्टी पाहात आहेत याची खात्री केली पाहिजे. तसेच जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसोबत असता तेव्हा सकारात्मकच बोलले पाहिजे.

काय सांगता काय? हाय हील्स सँडल्स पहिल्यांदा स्त्रियांसाठी नव्हे, तर पुरुषांसाठी करण्यात आले होते विकसित

मुलांसोबत खेळा
तुमच्या मुलांना तुमची सर्वात जास्त गरज असते. तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनातून थोडा वेळ काढून तुमच्या मुलानांसोबत थोडा वेळ घालवला पाहिजे. यामुळे मुलांना सुरक्षित वाटते आणि त्यांचे तुमच्याशी घट्ट नाते निर्माण होऊ लागते. त्यांच्याबरोबर त्यांचे आवडते खेळ खेळा (Play With Child) आणि ते काय म्हणतात ते ऐका.

मुलांसोबत या गोष्टी अजिबात करू नका…

जोडीदाराशी भांडण
पालकांमधील वाद मुलांना खूप सहजपणे ओळखता येतो. ते त्यांच्या पालकांना घाबरतात (Don’t Fight Infront Of Child) आणि त्यांच्या मोठ्या आवाजामुळे आणि मतभेदांमुळे त्यांच्यापासून अंतर निर्माण करतात. जर तुम्हाला तुमच्या मुलांचा आनंद हवा असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मुलांसमोर अजिबात भांडू नका.

मुलांवर ओरडणे
मुले अनेक आणि काहीही प्रश्न विचारू शकतात. आपण त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही देतो. मात्र अनेकदा ताणतणावामुळे (Don’t Shout At Child) तुम्ही त्यांच्या प्रश्नांच्या भडिमारामुळे चिडू शकता. परंतु अशावेळी त्यांच्यावर ओरडणे हा उपाय नाही. तुमच्या मुलांशी कधीही आक्रमकपणे वागू नका कारण ते त्यांच्यावर दीर्घकाळ टिकणारे प्रभाव निर्माण करू शकतात.

पावसळ्यातही उजळेल तेलकट चेहरा, ‘या’ सोप्या उपायांची करा अंमलबजावणी

मुलांकडे दुर्लक्ष करू नका
पालक म्हणून तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम सेट करू शकता. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मुलाकडे दुर्लक्ष केले पाहिजे. तुमच्या मुलाला त्यांच्या आजी आजोबा (Don’t Ignore Child) किंवा काळजीवाहूंसोबत काही काळ सोडणे ठीक आहे. मात्र त्यांना वारंवार एकटे सोडल्याने ते तुमच्यापासून दूर जाऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#लहन #मलच #मनसक #आरगय #जपण #आह #एक #आवहन #य #उपयन #मल #रहतल #आनद

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

IND vs ENG : भारतासाठी आनंदवार्ता! रोहित शर्मा कोविड विलगीकरणातून बाहेर

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यानंतर तीन एकदिवसीय आणि तीन टी २० सामन्यांच्या दोन मालिका भारताला खेळायच्या आहेत....

“मला मराठीतील ‘या’ दिग्दर्शकासोबत काम करायचं”, ‘SHE’ वेबसीरीजमधील अभिनेत्रीचे वक्तव्य चर्चेत | Aaditi Pohankar talk about Marathi comeback wants to work with marathi director...

मराठी अभिनेत्री आदिती पोहनकर ही सध्या SHE या वेबसीरीजमुळे चर्चेत आली आहे. आदिती पोहनकरने या सीरिजमध्ये एका पोलिसाची भूमिका केली आहे. तिच्या SHE...

Corona : मुंबईत पुन्हा हजारापेक्षा कमी रूग्णांची नोंद, दोघांचा मृत्यू

महाराष्ट्रात शनिवारीही कोरोनाच्या रूग्णसंख्येमध्ये घट दिसून आली.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

IND vs ENG Edgbaston Test Ravindra Jadeja slams back to James Anderson vkk 95

भारत आणि इंग्लंड यांच्यातील निर्णायक कसोटी सामना एजबस्टन येथे खेळवला जात आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस असून इंग्लंड पहिल्या डावात अद्याप पिछाडीवर...

कैवल्य वारी ! आषाढी एकादशीनिमित्त खास गाणी प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: आषाढी एकादशीसाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. पंढरपूरची वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील महामहोत्सव. या दिवसांत अनेक वारीनिमित्त अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला...

एअरपोर्टवरचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं करण जोहरच्या मुलांचं कौतुक

मुंबई: बॉलिवूड सेलिब्रिटीं कधी कुठे जातात, कुठून परत येतात यावर बारीक लक्ष ठेवून असणारे फिल्मी फोटोग्राफर एक छबी मिळावी म्हणून पायपीट करत असतात....