Thursday, May 26, 2022
Home मुख्य बातम्या लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर


मुंबई, 16 जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संबंधित घटनेबाबतची बातमी आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण संबंधित मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे झाला नसल्याचा दावा महानगर पालिकेनं केला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील या घटनेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील रहिवासी असणाऱ्या 15 वर्षीय आर्याने 8 जानेवारी रोजी राजावाडी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. लस घेतल्यानंतर 12 जानेवारी तिचा अचानक मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृत्यू लसीकरणामुळे झाल्याचा मजकूर तिच्या फोटोसह सोशल मीडियावर टाकण्यात आला होता. यानंतर पालिकेची यंत्रणा सतर्क झाली, त्यांनी संबंधित व्यक्तीकडे लसीकरणामुळे मृत्यू झाल्याचे पुरावे मागितले. पण त्याच्याकडे एकही पुरावा नव्हता.
हेही वाचा-70 वर्षीय शेतकऱ्याचा शिरच्छेद करत मुंडकं केलं गायब, बीडला हादरवणारी घटना
या घटनेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी मृत मुलीच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचं सांत्वन केलं. या भेटीनंतर महापौर पेडणेकर यांनी सांगितलं की, मृत आर्याच्या आजोबांच्या मते लसीकरणामुळे तिचा मृत्यू झालेला नाही. तिने अभ्यासाचा अतिताण घेतला होता. हा ताण असह्य झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊन तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दु:खद प्रसंगी कोणीही याचं राजकारण करू नये, असं आवाहनही महापौरांनी केलं आहे.
हेही वाचा-नागपूर: सासू-सुनेच्या वादात चिमुकल्याचा हकनाक बळी, जन्मदातीनेच दिला भयंकर मृत्यू
याबाबत अधिक माहिती देताना पालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं की, संबंधित मुलीचा लसीकरण घेतल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर मृत्यू झाला आहे. तसेच खाजगी डॉक्टरांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असं लिहिलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवून दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. याचा तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#लस #नवह #तर #यमळ #गल #जव #घटकपरमधल #मलचय #मतयच #धककदयक #करण #समर

RELATED ARTICLES

बॅकलेस ड्रेस घालून Karan Johar च्या पार्टीत पोहचली Ananya Panday

.सध्या बी-टाऊनमध्ये जर कशाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे करण जोहरच्या बर्थडे पार्टीची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण

लंडन, 26 मे : कोरोना काळात बऱ्याच लोकांनी वर्क फ्रॉम होम (Work from home side effect) केलं. काही ऑफिसेस आता सुरळीत झाले असले तर...

मोठी बातमी! शरद पवारांना वगळून देशात भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन होणार?

मुंबई, 26 मे : केंद्रात भाजपला (BJP) शह देण्यासाठी देशभरातील विविध राज्यातील विरोधक एकवटण्याच्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या (Third Front)...

Most Popular

शिखर धवनला वडिलांकडून मारहाण, आधी कानाखाली मारली मग लाथा बुक्क्यांनी मारहाण केली; Viral झाला घरातील ‘तो’ Video | IPL 2022 Shikhar Dhawan beaten up...

आयपीएल २०२२ च्या सुरुवातीला पंजाबच्या संघाने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का देत उत्तम कामिगिरी केली. याच कामगिरीमुळे आता पहिल्यांदाच पंजाबचा संघ किमान अंतिम फेरीपर्यंत...

‘कुत्र्याने दर्शन घेतल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या’; ब्लॉगरचं मोदींनाच पत्र

नवी दिल्ली, 26 मे : नोएडाचा (Noida News) ब्लॉगर केदारनाथमध्ये आपल्या पाळीव कुत्र्यासह फिरायला आला होता. या हस्की जातीच्या कुत्र्याचं नाव नवाब त्यागी आहे....

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : त्सित्सिपासचा निसटता विजय; जोकोव्हिच, झ्वेरेव्ह, सबालेंका, अझरेंकाचीही आगेकूच; रॅडूकानू पराभूत | French Open tennis tournament Tsitsipas runaway victory Past...

एपी, पॅरिस : गतउपविजेत्या ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत निसटत्या विजयाची नोंद केली. तसेच गतविजेता नोव्हाक जोकोव्हिच आणि तिसऱ्या...

Maharashtra Breaking News 26 May 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

<p style="text-align: justify;">राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील हे आता स्पष्ट झालंय. कारण आज संजय राऊत आणि...

बॅकलेस ड्रेस घालून Karan Johar च्या पार्टीत पोहचली Ananya Panday

.सध्या बी-टाऊनमध्ये जर कशाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे करण जोहरच्या बर्थडे पार्टीची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

तुमच्या मोबाईलवर ‘रेड वॉर्निंग’ चा इशारा येतोय का? आताच पाहा ही बातमी

मुंबई : गुगल, या सर्च इंजिनकडून कायमच युजर्सच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. सायबर क्राईमपासून युजर्सना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांची खासगी माहिती गोपनीय ठेवण्यासाठी...