Thursday, May 26, 2022
Home मुख्य बातम्या लसीचे दोन डोस घेतले असतील तरच लोणावळ्यासह मावळ तालुक्यात मिळणार प्रवेश, अन्यथा....!

लसीचे दोन डोस घेतले असतील तरच लोणावळ्यासह मावळ तालुक्यात मिळणार प्रवेश, अन्यथा….!


Pune Corona Restrictions : पुण्यातील (Pune) प्रसिद्ध पर्यटनस्थळी म्हणजे लोणावळ्यात (Lonavala) लसीचे दोन डोस घेतले असतील तरच प्रवेश मिळणार आहे. यासाठी प्रशासनाकडून मुंबई आणि पुण्याच्या एन्ट्री पॉइंटवर चेक पोस्ट लावण्यात येणार आहेत. सोमवारी 17 जानेवारीपासून याची अंमलबजावणी सुरू होईल. शिवाय ज्यांनी दुसरा डोस घेतला नसेल आणि त्यांची मुदत ओलांडली असेल तर नाक्यावरच त्या व्यक्तीस लस टोचली जाणार आहे. 

वडगाव मावळ तालुक्यातील लोणावळ्यासह कामशेत, कान्हे रेल्वे गेट, वडगाव आणि तळेगावच्या एन्ट्री पॉइंटवर ही अशीच नाकाबंदी करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेत, त्यामुळेच ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आठशे पार गेली आहे. 

कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने तालुका प्रांताधिकाऱ्यांनी अशी खबरदारीची पावलं उचलली आहेत. एन्ट्री पॉइंटच्या प्रत्येक चेकपोस्टवर नगरपंचायत आणि नगरपरिषद प्रशासनाच्या मदतीला पोलीस ही तैनात असतील. ते प्रत्येक व्यक्तीला चेक पोस्टवर रोखणार आहेत. 

त्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेत का? एकच डोस घेतलाय आणि त्यांची दुसऱ्या डोसची मुदत संपलीये का? किंवा आत्तापर्यंत लसच घेतली नाही याची पडताळणी केली जाईल. शिवाय लस न घेतलेल्यांना चेक पोस्टवरच लस टोचण्यात येणार आहे.

काल राज्यात कोरोनाच्या 42,462 नव्या रुग्णांची भर

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. काल राज्यात कोरोनाच्या 42,462 नव्या रुग्णांची भर झाली असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात 39,646 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सलगपणे राज्यात 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होतेय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात काल 125 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.  आतापर्यंत 1730 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 879 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#लसच #दन #डस #घतल #असतल #तरच #लणवळयसह #मवळ #तलकयत #मळणर #परवश #अनयथ

RELATED ARTICLES

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

बॅकलेस ड्रेस घालून Karan Johar च्या पार्टीत पोहचली Ananya Panday

.सध्या बी-टाऊनमध्ये जर कशाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे करण जोहरच्या बर्थडे पार्टीची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण

लंडन, 26 मे : कोरोना काळात बऱ्याच लोकांनी वर्क फ्रॉम होम (Work from home side effect) केलं. काही ऑफिसेस आता सुरळीत झाले असले तर...

Most Popular

Jio data plans: जिओकडे आहे अवघ्या १५ रुपयांचा शानदार रिचार्ज प्लान, हाय-स्पीड डेटाचा मिळेल फायदा

नवी दिल्ली :Reliance Jio Data Add on Plans: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio कडे कमी किंमतीत येणारे अनेक शानदार प्लान्स...

धक्कादायक! क्रिकेटर Shikhar Dhawan ला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

मुंबई : आयपीएल 2022 च्या प्लेऑफसाठी 4 टीम पात्र ठरल्या. पण यामध्ये शिखर धवनची टीम पंजाब किंग्जचं नशीब यंदाही खराब ठरलं. पंजाबला प्लेऑफमध्ये...

इतर सीरिजमधील बोल्ड सीनबद्दल काय म्हणाली होती प्राजक्ता? वाचून विश्वास बसणार नाही

मुंबई: 'रानबाजार' या मराठी वेब सीरिजची सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे. मराठीमधील आतापर्यंतची सर्वात बोल्ड सीरिज असल्याचा दावा करण्यात आला आहे. सीरिजमध्ये प्राजक्ता...

रजत पाटीदार नव्हे तर RCBच्या विजयाचा खरा हिरो ठरला फिल्डर; पाहा व्हिडिओ

कोलकाता: आयपीएलच्या एलिमेनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या लढतीत एक वेळ अशी होती की रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव होईल असे वाटत होते. संघातील मुख्य...

अभिनेत्री मुक्ता बर्वेचा आक्रमक अंदाज; ‘वाय’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

मुंबई, 26 मे:  अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) नेहमीच नवीन चांगल्या आशयाचे आणि विषयाचे चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. आजवर अनेक भूमिकांमध्ये आपण...