Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल लसीकरणानंतर Polio संसर्गाची चिंता सोडा! nOPV2 लस cVDPV2 देणार टक्कर, WHO नेसुद्धा...

लसीकरणानंतर Polio संसर्गाची चिंता सोडा! nOPV2 लस cVDPV2 देणार टक्कर, WHO नेसुद्धा दिली मंजुरी


नवी दिल्ली, 04 ऑगस्ट : लसीकरणानंतरही (Vaccination) संसर्गाचा धोका असतो. तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या पोलिओ (Oral polio vaccine) लसीकरणानंतर (Polio vaccination) अशीच प्रकरणं जगातील काही देशात वाढत आहे. त्यामुळे भारतातून पोलिओचा (Polio) पूर्णपणे खात्मा झाला असला तरी निर्धास्त राहून चालणार नाही. पण तरी आता चिंता करण्याचीही गरज नाही. कारण पोलिओ लसीकरणानंतर होणाऱ्या सीव्हीडीपीव्ही2 (cVDPV2) ला टक्कर देणारी एनओव्हीपीव्ही2  (nOPV2) ही नवी ओरल पोलिओ लस आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे.
भारत पूर्णपणे पोलिओमुक्त आहे. गेल्या दोन अडीच वर्षात पी श्रेणीतील कोणताच व्हायरस सापडला नाही आणि व्हीडीपीव्हीचाही उद्रेक झालेला नाही. पण जर लशीमुळे निर्मित व्हायरसचा शिरकाव झाला तर परिस्थिती कठीण होईल.
भारतात दोन पोलिओ लशी दिल्या जातात. एक इंजेक्शनवाटे आईपीवी (IPV) आणि दुसरी तोंडावाटे ड्रॉपने दिली जाणारी बीओपीवी (bOPV). या लशी पी1 आणि पी3 ला रोखू शकता. राहिला पी2 व्हायरस ज्यामुळे इम्युनिटी कमजोर होते. या व्हायरसने एकदा शिरकाव केला तर महासाथीचा धोका उद्भवू शकतो. ही महासाथ रोखण्यासाठी एक मोनोवेलेंट ओपीव्ही टूचा ड्रॉप बनवण्यात आला पण तो शरीरात जाऊन VDPV व्हायरस बनवतो. त्यामुळे अनेक ठिकाणी हा व्हायरस दिसून येतो. त्यामुळे अशा व्हायरस किंवा लशीची गरज होती जी VDPV मध्ये बदलणार नाही, जेनेटिकरित्या स्थिर असेल. nOPV2 ही अशीच लस आहे.
हे वाचा – 2 महिने प्रतीक्षा करण्याची गरज नाही; मुंबईकरांना 2-4 दिवसांतच समजणार कोरोनाचं बदलतं रूप
जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल एडव्हायझरी कमिटी फॉर वॅक्सिन सेफ्टीचे (GACVS)  सदस्य आणि भारतातील नॅशनल सर्टिफिकेशन कमिटी फॉर पोलिओ इरेडिकेशनचे (NCCPE) अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितलं की, हा व्हायरस सर्वात खतरनाक नाही. भारतातून 1999 साली या व्हायरसचा खात्मा झाला होता पण ओरल पोलिओ लस देत राहिल्याने VDPV2 व्हायरस पुन्हा होण्याची शक्यता वाढते जे खूप धोकादायक आहे. ओरल पोलिओ लशीमुळे होणाऱ्या दुष्परिणांमुळे निर्माण होणारा व्हायरस म्हणू शकतो. त्यामुळेच यासाठी दुसरी लस बनवण्याची गरज पडली.
हे वाचा – Explainer : Covishield लस कितपत प्रभावी? काय सांगतो जगातला सर्वात मोठा अभ्यास?

नोव्हेंबर 2020 मध्ये या लशीचं ट्रायल सुरू झालं. आता दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. आफ्रिका देश आणि आशियातील बांग्लादेश जिथं व्हीजीपीव्हीटूचा उद्रेक झाला आहे, तिथंच याचा वापर करण्यात आला आहे. ही लस नियमित लसीकरणात दिली जाणार नाही. सीव्हीडीपीव्ही टूचा उद्रेक झाल्यावर दिली जाईल. शिवाय संपूर्ण देशात ही लस दिली जात नाही तर जिथं उद्रेक झाला आहे, तिथंच ही लस दिली जाते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#लसकरणनतर #Polio #ससरगच #चत #सड #nOPV2 #लस #cVDPV2 #दणर #टककर #नसदध #दल #मजर

RELATED ARTICLES

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात

<p>Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Most Popular

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २१ ऐवजी २० नोव्हेंबरपासून

एपी, जीनिव्हा : यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित...