लसणाची पाने किंवा हिरवे लसूण खाण्याचे फायदे –
रोग प्रतिकारशक्ती वाढवते हिरवा लसूण –
healthbenefitstimes.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, हिरव्या लसणाचे अनेक आरोग्य फायदे आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. हिरव्या लसणात अॅलिसिन नावाचे सल्फर कंपाऊंड असते, जे लसणाच्या वासासाठी जबाबदार असते. या विशिष्ट सल्फर पदार्थामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध –
हिरवा लसूण अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. याव्यतिरिक्त, त्यात दाहक-विरोधी घटक देखील असतात, जे अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून संरक्षण करतात.
लोह समृद्ध –
लसणाच्या पानात लोह मुबलक प्रमाणात असते. ज्या लोकांचे रक्त कमी आहे किंवा त्यांच्या शरीरात अशक्तपणा आहे, त्यांनी लसणाची पानं नक्की खायला हवी.
हे वाचा – चेहऱ्याच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; तिळावरून असं कळतं व्यक्तिमत्व
हिरव्या लसणामुळे हृदय निरोगी राहते –
लसूण हृदयासाठी एक उत्तम औषधी वनस्पती आहे. हिरव्या लसणात पॉलिसल्फाइड असते, जे हृदयाला रोगांपासून वाचवते. ही स्प्रिंग वेजी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे, कारण त्यात मँगनीज असते. हे खनिज शरीरात चांगली कोलेस्ट्रॉल पातळी (HDL) राखते. शरीरात जितके जास्त मँगनीज असेल तितके हृदय चांगले राखण्यासाठी HDL चे प्रमाण जास्त असेल.
हे वाचा – कुत्रा अचानक अंगावर आल्यावर असं चुकून पण करायचं नसतं; नाहीतर नक्की चावेल
पोटत संसर्गापासून संरक्षण –
सर्दी आणि खोकल्याशी लढण्याव्यतिरिक्त, हिरवा लसूण गॅस्ट्रो-इंटेस्टाइनलमध्ये उद्भवणारे सूक्ष्मजंतू संसर्ग दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे. पोटाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी तुम्ही हिरवा लसूण नियमितपणे खाऊ शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#लसणच #पत #कव #हरव #लसण #आरगयसठ #वरदन #पट #हदयवकरवर #अस #हत #फयद