‘नाम रह जाएगा’मध्ये लता मंगेशकर यांच्या जीवनाचं सत्य
नाम रह जाएगाच्या पुढच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना आधी न पाहिलेले फोटोज, काही किस्से कळणार आहेत. याआधी हे कुठेच सांगितलं गेलं नव्हतं. या भागात लता मंगेशकर यांनी लग्न का केलं नाही, हेही समोर येईल. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांना मारण्याचा प्रयत्नही केला गेला होता, हेही प्रेक्षकांना कळणार आहे.
RRR सह पुढील १५ दिवसांत हे सिनेमे होतील ओटीटीवर रिलीज
लता मंगेशकरांना म्युझिक इंडस्ट्रीची स्वरांजली
या शोमध्ये प्यारेलाल, सोनू निगम, अरजीतत सिंह, शंकर महादेवन, नितिन मुकेश, नीति मोहन, अलका याज्ञिक, साधना सरगम, उदित नारायण, शान, कुमार शानू, अमित कुमार, जतिन पंडित, जावेद अली लतादीदींची शानदार गाणी गाणार आहेत. ऐश्वर्या, स्नेहा, पलक मुच्छल आणि अन्वेशा हेही असतील. रसिक प्रेक्षकांसाठी ही मोठी सांगीतिक सफर आहे.
आई कुठे काय करते : आशुतोषनं डोळे उघडले, संकट टळलं; अरुंधतीचा जीव भांड्यात, Video Viral
६ फेब्रुवारीला लतादीदींनी घेतला शेवटचा श्वास
९२ वर्षीय लतादीदींना काही दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना करोना व न्यूमोनियाची लागण झाल्याचं तपासणीनंतर समोर आलं होतं. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांनी करोनावर मातही केली होती. प्रकृती सुधारल्यामुळं त्यांची कृत्रिम श्वसनयंत्रणाही काढण्यात आली होती. मात्र, वय जास्त असल्यानं खबरदारी म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. पण त्यांची प्रकृती खालावत गेली.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#लत #मगशकर #यन #वष #दऊन #मरणयच #कल #हत #परयतन #नम #रह #जएगमधय #उलगडणर #सतय