Saturday, November 27, 2021
Home क्रीडा लज्जास्पद! क्रिकेटच्या माहेरघरात भलताच प्रकार, गद्दार खेळाडूचा टीमच्या प्रमोशनासाठी वापर

लज्जास्पद! क्रिकेटच्या माहेरघरात भलताच प्रकार, गद्दार खेळाडूचा टीमच्या प्रमोशनासाठी वापर


लंडन, 29 जुलै :  इंग्लंडमध्ये सध्या ‘द हंड्रेड’ (The Hundred) या क्रिकेटमधील संपूर्ण नव्या प्रकारातील स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील सामन्यामध्ये एका इनिंगमध्ये 100 बॉलची मर्यादा आहे. पुरुष आणि महिला या दोन्ही गटात सध्या ही स्पर्धा सुरु आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून (ECB) या स्पर्धेचं जोरदार प्रमोशन करण्यात येत आहे. यावेळी लंडन स्पिरीट (London Spirit) या टीमनं प्रमोशनसाठी वापरलेल्या पोस्टरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
लंडन स्पिरीट या टीमचे होम ग्राऊंड हे क्रिकेटचे माहेरघर समजले जाणारे द लॉर्डस (The Lords) आहे. या मैदानाला मोठा इतिहास असल्यानं क्रिकेट विश्वात याची मोठी प्रतिष्ठा आहे. या टीमनं फेसबुकवर केलेल्या प्रमोशनामध्ये पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरचा (Mohammad Amir) फोटो वापरला आहे.
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात 2010 साली लॉर्डस मैदानावर झालेल्या टेस्टमध्ये आमिर स्पॉट फिक्सिंग करताना सापडला. स्पॉट फिक्सिंगमधील त्याचा सहभाग सिद्ध झाला. त्यामुळे सलमान बट आणि मोहम्मद आसिफ या पाकिस्तान टीममधील सहकाऱ्यासह त्याच्यावर  क्रिकेट खेळण्याची बंदी घातली होती. पाच वर्षांची बंदी संपवून आमिर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत आला आहे.

आमिरनं मागच्या वर्षी  पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) गंभीर आरोप करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली आहे.  न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी निवड न झाल्यानं आमीरनं आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या रिटायरमेंटनंतरही बराच वाद झाला असून तो वाद अजूनही पूर्ण संपलेला नाही.
IND vs SL : आणखी 2 जण करणार पदार्पण, वाचा कशी असेल टीम इंडियाची Playing 11
लंडन स्पिरीट टीमचा कॅप्टन इऑन मॉर्गन असून शेन वॉर्न या टीमचा कोच आहे. मॉर्गनच्या फोटोचा वापर न करता क्रिकेटशी गद्दारी करणाऱ्या मोहम्मद आमिरचा फोटो या टीमनं झळकावल्यानं नाराजी व्यक्त केली जात आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#लजजसपद #करकटचय #महरघरत #भलतच #परकर #गददर #खळडच #टमचय #परमशनसठ #वपर

RELATED ARTICLES

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Most Popular

… तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला

कानपूर, 27 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 27 नोव्हेंबर 2021 : शनिवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

दिल्ली, 27 नोव्हेंबर: अनेकांना कॉफी (Coffee) प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यावर, ऑफिसमध्ये काम करताना किंवा थकल्यावर मेंदू आणि शरीराला पुन्हा तरतरी आणण्यासाठी कॉफी...

संप अखेर मिटला? कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचे ST कृती समितीचं आवाहन

मुंबई, 26 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा (st bus strike) संप अखेर मिटल्यात जमा झाला आहे....

महागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...