मुंबई : कतारमधून एक अशी बातमी समोर येत आहे, जी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. खरंतर येथे सेक्सबाबात कडक नियम आहेत. ज्यामुळे येथील लोकांना किंवा येथे येणाऱ्या पर्यटकांना देखील हा नियम लागू आहे. येथे पती-पत्नी व्यतिरिक्त इतर कोणाशीही लैंगिक संबंध ठेवणे देखील बेकायदेशीर आहे. होय, तुम्ही फक्त नात्यात आहात म्हणून किंवा एकमेकांच्या समंतीने देखील तुम्ही शारीरीक संबंध ठेवत असाल, तरी ते बेकायदेशीर आहे. ज्याची कठोर शिक्षा देखील आहे.
त्यामुळे कतारमध्ये जर अविवाहित जोडपं लैंगिक संबंध ठेवताना पकडले गेले, तर पोलीस त्यांना अटक करू शकतात. समलैंगिक संबंधात राहणाऱ्या जोडप्यावरही ही कारवाई होऊ शकते. ज्याची शिक्षा एक-दोन नाही तर थेट सात वर्ष तुरुंगवास आहे.
खरंतर ही बातमी फीफा वर्डकप दरम्यान समोर आली. जेव्हा येथे येणाऱ्या पर्यटकांना किंवा लोकांना या नियमांची आठवण करुन दिली गेली.
कतार हे यावर्षी फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. त्यामुळे येथेच वर्लकप होणार आहे.
‘डेली स्टार’ने कतार पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ”तुम्ही पती-पत्नी म्हणून येत असाल तर ठीक आहे. पण जर तुम्ही एकटे किंवा अविवाहित जोडपे असाल, तर येथे येऊन सेक्स करण्याची चूक करु नका.”
यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच सेक्स बंदी सक्तीची केली आहे. तसेच मॅचनंतर होणाऱ्या आणि गोंगाट करणाऱ्या पार्ट्यांनाही बंदी आहे. मॅचनंतर मद्यपान करणे आणि पार्टी करणे हा विश्वचषकातील चाहत्यांचा ट्रेंड आहे, परंतु असे असले, तरी या वेळी मात्र त्या सगळ्यावर बंदी आहे.
कतारमध्ये विवाहबाह्य लैंगिक संबंध आणि समलैंगिकता बेकायदेशीर आहे. अशा परिस्थितीत कतारची हॉटेल्स वेगवेगळ्या आडनाव असलेल्या जोडप्यांना रूम देत नाहीत.
कतारमधील फिफा 2022 विश्वचषक स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासेर यांनी म्हटले आहे की, ”प्रत्येक चाहत्याची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. विवाहा शिवाय सेक्स किंवा शरीर संबंध हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही. इथे कोणी येत असेल तर त्यांना देशाचे नियम पाळावे लागतील.”
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#लगनशवय #सकस #करल #तर #वरष #तरगत #जल #कतरचय #सरकरकडन #इशर