Thursday, July 7, 2022
Home करमणूक लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता...

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…


मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न केलं. ह्रताच्या लग्नाला मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ते आदिश वैद्य (Adish Vaidya) पर्यंत अनेक कलाकार उपस्थित होते. ‘फुलपाखरु’ (Phulpakhru)  मालिकेची संपूर्ण टीम देखील लग्नाला हजर होती. इतकी सगळी मंडळी लग्नात होती तरी महाराष्ट्राचा चॉकलेट बॉय इंद्रा (Indra) म्हणजे अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) मात्र कुठेही दिसला नाही. तसेच मन उडू उडू झालं ( Man Udu Udu Zhala) मालिकेतील कोणत्याही कलाकाराचे फोटो ह्रताच्या लग्नात दिसले नाहीत. अनेकांनी अजिंक्य लग्नाला आला नाही का? असा प्रश्न ह्रताच्या पोस्ट केला होता. अंजिक्य ह्रताच्या लग्नाला का जाऊ शकला नाही याच कारण आता समोर आलं आहे.

अंजिक्यने एक न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेय, ‘ह्रताच्या लग्नादिवशी मी परभणीला होतो. माझ्या आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवस होता.  मी परभणीला गेलो त्यामुळे मला लग्नाला येता आलं नाही. ‘तु ह्रताच्या साखरपुड्याला होतास आता मम्मी पप्पांच्या लग्नाचा वाढदिवसाला चल’, असं माझी बहिण सहज म्हणाली. पण मी गावी गेल्यावर मम्मी पप्पाच माझ्यावर फार रागावले. ती तुझी सहकलाकार आहे तु तिच्या लग्नाला जायला हवं होतंस, असं ते म्हणाले.

हेही वाचा – Hruta Durgule Wedding: लग्नानंतर पतीसोबत ह्रता निघाली हनीमूनला, पहा तिचा पोस्ट ब्राइडल लुक

ह्रता आणि माझी फार चांगली मैत्री

अजिंक्य पुढे म्हणला, मी ह्रताच्या लग्नासाठी सुट्टी घेतली होती 15-16 मे रोजी मी सुट्टी घेतली होती 17मे रोजी मी मुंबईत येऊन 18 मेला लग्नाला येणार होतो. पण मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसकडून माझ्या सुट्ट्या पोस्टपोन झाल्याने मला लग्नाला हजर राहता आले नाही. त्यामुळे मी ह्रताला फोन करुन सांगितले, त्यावर ह्रता फार नम्रपणे म्हणली, ‘अजिंक्य काहीच हरकत नाही तू तुझ्या आई वडिलांसोबत सेलिब्रेट कर’. आमची मैत्री अनदर लेव्हलला आहे. त्यामुळे तिने मला समजून घेतलं.

लग्नाला न गेल्याने रागवल्या ह्रताच्या सासू

अजिंक्य आणि ह्रता यांच्यात फार घट्ट मैत्री आहे. तसेच ह्रताचा नवरा आणि तिची सासू अभिनेत्री मुग्धा शाह यांच्याशीही त्याचे फार चांगले संबंध आहेत. मात्र ह्रता आणि प्रतिकच्या लग्नाला न आल्याने त्या रागवल्याचं अंजिक्यने सांगितलं. अंजिक्य म्हणाला, ‘मला आताच निरोप मिळालाय ह्रताच्या सासू म्हणाल्यात, आता लग्नाला आला नाहीस ना आता ओळखही दाखवायला येऊ नकोस’.

मी ह्रताच्या लग्नाला जरी हजर राहू शकलो नाही तरी तिच्या इथून पुढच्या सगळ्या सोहळ्यांमध्ये मी तिच्याबरोबर असेन. तिला काही अडचण आली तर केव्हाही आणि कधीही मी तिच्याबरोबर असेन, असं देखील अंजिक्य मुलाखतीत म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#लगनल #न #आलयन #अजकयवर #भडकलय #हरतचय #सस #महणलय #आत

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

बोर्डिंग स्कूल सिंड्रोम म्हणजे काय? या स्थितीत मुलं का होतात एकटी?

मुंबई, 5 जुलै : आपल्या पाल्यानं मोठं होऊन खूप सन्मान आणि नाव कमावावं ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. यामुळेच पालक मुलांच्या शिक्षणात कोणतीही...

हॉटेलमध्ये सुरक्षित मुक्कामासाठी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स

मुंबई 05 जुलै : अनेकदा कुठेतरी फिरायला किंवा कामानिमित्त बाहेर गेलेलो असतो तेव्हा आपल्यावर हॉटेलमध्ये थांबण्याची वेळ येते. अशावेळी अनेकांच्या मनात हॉटेलच्या सुरक्षेबाबत...

एक मच्छर…! डेंग्यु, चिकनगुनिया या आजारांपासून आता डासच वाचवणार

पावसाळ्यात साथीच्या आजारांचं प्रमाण वाढतं. डेंग्यु, चिकनगुनिया हे आजार थैमान घालतात.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

आवाज कुणाचा… ! यंदा एका वर्षात 2 वेळा रंगणार पुरुषोत्तम एकांकीका स्पर्धा

Purushottam Karandak Pune:  आवाज कुणाचा...  असा आवाज दोन वर्षांनंतर पुण्यातील विद्यार्थांकडून नाट्यगृहात ऐकायला मिळणार आहे. पुण्यातील सर्वात मानाची...

Instagram Down: इंस्टाग्रामवरून मेसेज करताना येतेय समस्या, यूजर्सच्या तक्रारींचा ट्विटरवर पाऊस; शेअर केले मजेशीर मिम्स

नवी दिल्ली :Instagram down: फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप Instagram वापरताना यूजर्सला समस्या येत आहे. मेटाच्या मालकीचे Instagram आणि Facebook Messenger अ‍ॅप वापरताना...

Todays Headline 6th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...