टॉम मानने गर्लफ्रेंडच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर दिली
२८ वर्षीय टॉमने ही दुःखद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याची ३४ वर्षीय गर्लफ्रेंड डॅनिएल हॅम्पसन हिचा फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांचा आठ महिन्यांचा मुलगाही तिच्यासोबत दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत टॉमने डॅनिएलबद्दल म्हटलं आहे – माझा विश्वासच बसत नाही की मी हे सगळं लिहित आहे, पण माझी प्रिय दानी, माझी सर्वात चांगली मैत्रीण, माझे सर्वस्व आणि बरंच काही आणि याहून जास्त माझ्या प्रेमाने शनिवारी १८ जून रोजी सकाळी या जगाचा निरोप घेतला.
या गोष्टी मुलगा बोवीसाठी लिहिल्या आहेत
त्याने लिहिले की हा वेदनादायक अपघात त्याच दिवशी घडला जो त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस ठरणार होता. टॉमने लिहिले की या अपघाताने तो पूर्णपणे तुटला आहे आणि पुढे कसं जायचे हे त्याला समजत नाहीये. असं असलं तरी, टॉमने त्याच्या आठ महिन्यांच्या मुलासाठी, बॉवीसाठी धैर्य गोळा करण्याचे ठरवले आहे. त्याने लिहिले, ‘तू जशी पालक होती तसा मी कदाचित होऊ शकणार नाही. परंतु आपल्या मुलाचं तसंच संगोपन करेन जसं आपल्या दोघांना करायचं होतं. त्यासाठी मी सर्वकाही करेन. मी वचन देतो की त्याची आई किती सुंदर होती हे त्याला कळेल. मी वचन देतो की तुला खूप अभिमान वाटेल.’
डॅनियलच्या मृत्यूचे कारण कळले नाही
पोस्टच्या शेवटी, त्याने लिहिले की तिच्याशिवाय त्याचे जीवन अंधाराने भरलेले आहे आणि तो तिला नेहमीच मिस करेल. मात्र, या पोस्टमध्ये त्याने डॅनियलच्या मृत्यूचे कारण सांगितलेले नाही.
इन्स्टाग्रामवर बाबांना केलं ब्लॉक, पण बहिणीने दाखवले फोटो
चाहत्यांनाही झाले अतीव दुःख
टॉमच्या या पोस्टवर त्याचे चाहते दु:ख व्यक्त करत आहेत आणि सोशल मीडियावर त्याला आणि त्याच्या मुलाला धीर देण्याचं काम करत आहेत. दरम्यान, दोघांनी २०१९ मध्ये त्यांचे नवीन घरदेखील विकत घेतले होते, ज्याचा आनंद त्यांनी चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केला होता.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#लगनचयच #दवश #वरल #अभनतयच #पतन #मग #सडन #गल #आठ #महनयच #बळ