Thursday, May 26, 2022
Home भारत लग्नाआधीचे आजार लपवणं धोका! असं असेल तर लग्न रद्द होऊ शकतं- दिल्ली...

लग्नाआधीचे आजार लपवणं धोका! असं असेल तर लग्न रद्द होऊ शकतं- दिल्ली हायकोर्ट


Delhi High Court on Marriage : भारतात विवाहसंस्थेचं महत्व अधिक आहे. लग्नानंतर आयुष्यभर एकमेकांच्या सुख दुख:त सोबत राहण्याच्या शपथा घेतल्या जातात. नवरा-बायकोच्या नात्यात विश्वास असणं हा नात्याचा कणा मानला जातो. जर विश्वासघात केला किंवा धोका दिला तर नात्याला ग्रहण लागलंच म्हणून समजा. अशात आता दिल्ली हायकोर्टानं एक महत्वाचा निकाल दिला आहे.  दिल्ली हायकोर्टानं एका प्रकरणात निकाल सुनावताना म्हटलं आहे की, लग्नाआधी पती किंवा पत्नीकडून त्यांना असलेल्या आजाराबद्दल माहिती न देणं धोका आहे. आणि असं असेल तर हे लग्न रद्द होऊ शकतं, असं कोर्टानं म्हटलं आहे. कोर्टानं कौटुंबिक न्यायालयाचा एक आदेश रद्द करत एका व्यक्तिचं लग्न रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.  न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती जसमीत सिंह यांच्या खंडपीठानं हे लग्न रद्द करत म्हटलं आहे की, जर एखाद्या व्यक्तीची चूक नसेल तर कुठल्याही व्यक्तीला त्रास होऊ शकतो.

कोर्टानं म्हटलं आहे की, या प्रकरणातील महिलेनं मान्य केलं आहे की, तिला कॉलेज वयापासून डोकेदुखीचा त्रास होता, त्यामुळं तिचं शिक्षण बंद झालं. खंडपीठानं असंही म्हटलं की, डोकेदुखी मोठा आजार नाही. हे केवळ एखाद्या आजाराचे लक्षण आहे. मात्र महिलेने हे सांगितलं नाही की, तिला गंभीर आणि सततची डोकेदुखी होती. त्यामुळं तिला शिक्षण सोडावं लागलं. कोर्टानं म्हटलं आहे की, मानसिक आजारानं पीडित असलेल्या व्यक्तिच्या मुलांवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. लग्नाच्या जवळपास 9 आठवड्यानंतर या महिलेच्या वडिलांनी तिला आपल्या घरी नेलं होतं.  

खंडपीठानं म्हटलं आहे की, या सर्व प्रकरणात दुर्देवी पद्धतीनं पतीचं आयुष्य त्रासदायक झालं. तो नाहक गेल्या 16 वर्षांपासून या नात्यात अडकून पडला आहे. जीवनाच्या सर्वात महत्वाच्या काळात याचिकाकर्त्याला वैवाहिक आनंद मिळू शकला नाही. महिलेच्या हट्टापायी त्याला त्रास सोसावा लागला यामुळं कोर्टानं सदर महिलेला 10 हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.  

काय आहे प्रकरण
या प्रकरणात पतीनं एक याचिका दाखल म्हटलं होतं की, 10 डिसेंबर 2005 रोजी त्याचं लग्न झालं होतं. त्याच्या सासरकडून त्याच्या पत्नीच्या आजाराविषयी माहिती लपवण्यात आली. सदर महिला ही लग्नाआधी अॅक्यूट सिजोफ्रेनिया आजारानं पीडित होती. प्रतिवादीनं आपल्या लग्नानंतर घरी आणि हनिमूनदरम्यान असामान्य वर्तणूक दिली. जानेवारी 2006 मध्ये त्या महिलेला दवाखान्यात नेण्यात आलं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की, ही महिला अॅक्यूट सिजोफ्रेनियानं पीडित आहे. यानंतर पतीनं याचिका दाखल केली.

IVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#लगनआधच #आजर #लपवण #धक #अस #असल #तर #लगन #रदद #हऊ #शकत #दलल #हयकरट

RELATED ARTICLES

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये...

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

Most Popular

Skin Care for Men : मुलांनो, वयापेक्षा लहान व तरूण दिसाल, फक्त ताबडतोब सोडा ‘या’ 4 घाणेरड्या सवयी, लग्नात नवरीपेक्षा चमकेल चेहरा..!

सौंदर्य वा स्कीन केअर ही गोष्ट केवळ स्त्रियांनीच केली पाहिजे असं काही नाही. पुरुषांनी देखील याकडे लक्ष दिले पाहिजे. जर नाही दिले तर...

दीपूला सानिकाने धक्का दिल्याचं सत्य येणार इंद्रासमोर? काय घडणार येत्या भागात?

मुंबई, 26 मे:  'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu zhal)  मालिकेला सध्या भावनिक वळण आलं आहे. लाडक्या दीपूचा अपघात झाल्यानं सगळ्यांना मोठा...

Realme Smartphone: रियलमीच्या पॉवरफुल ५जी स्मार्टफोनचा आज पहिला सेल, ४८MP कॅमेऱ्यासह मिळेल दमदार फीचर्स; पाहा किंमत

नवी दिल्ली :Realme Narzo 50 Pro 5G Sale: Realme ने आपला दमदार स्मार्टफोन Narzo 50 Pro 5G ला गेल्यावर्षी भारतात लाँच केले होते....

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : माझ्याबाबतच्या चर्चेत लोकांना रस -हार्दिक | Indian Premier League Cricket People interested talking hardik pandya ysh 95

पीटीआय, कोलकाता : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक चढ-उतार, दुखापती, शस्त्रक्रिया आणि वादविवादांचा सामना केला आहे. आक्रमक आणि बिनधास्त वृत्तीमुळे...

दैनंदिन राशिभविष्य : या राशीच्या व्यक्तींनी आज सावध राहावं; शनी ठरणार त्रासदायक

आज दिनांक 26 मे 2022. वार गुरुवार. तिथी वैशाख कृष्ण एकादशी. आज चंद्र रेवती नक्षत्रात मीन राशीत असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आत्मसन्मान...