विराट कोहलीनंतर भारताचे कर्णधारपद रोहितकडे आले होते. सध्याच्या घडीला रोहित आणि कोहली हे चांगल्या फॉर्मात पाहायला मिळत नाही. त्यामुळे विराट आणि रोहित हे दोघेही भारतीय संघाबाहेर जाणार असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर लोकेश राहुल, जसप्रीत बुमरा आणि रिषभ पंत यांनाही भारतीय संघात स्थान मिळणार नसल्याचे दिसत आहे. पण या परिस्थितीत भारतीय संघाचे कर्णधारपद कोणाला मिळणार, हा मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण भारताच्या कर्णधारपदासाठी आता दोन मोठे पर्याय समोर आले आहेत. हार्दिक पंड्या हा भारताच्या कर्णधारपदासाठी पहिला पर्याय समजला जात आहे. कारण सध्याच्या घडीला हार्दिकचे नेतृत्व हा चर्चेचा विषय आहे. कारण आयपीएलमध्ये हार्दिककडे गुजरात टायटन्सचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या संघाने आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रथम पोहोचण्याचा मान पटकावला आहे. सध्याच्या घडीला गुजरातच्या संघाचे १८ गुण झाले आहेत. आतापर्यंत आयपीएलमधील एकाही संघाला १८ गुण मिळवता आलेले नाहीत. त्याचबरोबर हार्दिककडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. दुखापतीमुळे तो भारतीय संघाबाहेर गेला होता. पण त्यानंतर मात्र हार्दिकचे नेतृत्व आयपीएलमध्ये चांगलेच बहरेलेले आहे. त्यामुळे हार्दिक हा भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी पहिला पर्याय ठरू शकतो.
भारताच्या संघासाठी कर्णधारपदासाठी दुसरा पर्याय असेल तो शिखर धवनचा. कारण भारतीय संघ जेव्हा श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा धवनकडे कर्णधारपद देण्यात आले होते. त्यामुळे धवन हा भारताच्या कर्णधारपदासाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. कारण त्याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाचाही अनुभव आहे. त्यामुळे आता भारताच्या कर्णधारपदी हार्दिक, शिखर किंवा अन्य कोणता खेळाडू येतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#रहत #शरम #टम #इडयबहर #जणर #भरतय #सघच #करणधरपद #कणल #मळणर #पह