Saturday, July 2, 2022
Home करमणूक रुग्णांची सेवा ते रंगभूमीची सेवा करणारे प्रतिभावान दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल!

रुग्णांची सेवा ते रंगभूमीची सेवा करणारे प्रतिभावान दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल!


Dr. Jabbar Patel Birthday : डॉक्टरकीसाठी स्टेथेस्कोप हाती धरलेल्या डॉ. जब्बार पटेल (Dr. Jabbar Patel) यांना कॅमेरा अधिक खुणावत होता. अखेर स्टेथेस्कोप खाली ठेवून कॅमेरा हाती घेत एक प्रतिभावान व सर्जनशील दिग्दर्शक म्हणून जब्बार पटेल यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, चित्रपट प्रेमाने ते या क्षेत्राकडे वळले. या क्षेत्रात पदार्पण करत, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले.

जब्बार रझाक पटेल यांचा जन्म 23 जून 1942 रोजी महाराष्ट्राची पवित्र संतभूमी, अर्थात पंढरपूरमध्ये झाला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच त्यांना शालेय नाटकांत काम करण्याची आणि सोबतच ते नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. हे नाटकं त्यांच्या या क्षेत्रात येण्याची पहिली पायरी ठरलं. सोलापुराचे श्रीराम पुजारी हे त्या काळचं नाट्यकलेच्या क्षेत्रातील मोठं नाव होतं. त्यांच्या घरी राहून जब्बार पटेल यांना साहित्य, संगीत व नाट्य या तीन क्षेत्रांतील लोकांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. या वास्तव्यात सगळ्या मातब्बर व्यक्तिमत्वांना जवळून जाणून घेता यावे, म्हणून पडेल ते काम करण्यास त्यांनी सुरुवात केली.

पडतील ती कामे केली!

लोकांना चहा देण्यापासून ते आंघोळीचे पाणी देण्यापर्यंतची कामे जब्बार करत. परिणामी कलेच्या क्षेत्रातील अनेक बारकावे त्यांच्या कानावर तुलनेने फारच लवकर पडले. यातून जे काही मिळत गेले ते जब्बार यांना पुढील वाटचालीस उपयुक्त ठरले. त्याच्या या अभ्यासूवृत्तीमुळेच त्यांनी शाळेत असताना बसवलेले ‘चाफेकर, हाडाचा झुंजार आहेस तू’ हे मूक नाट्य किंवा कॉलेजमध्ये असताना ‘तुझे आहे तुजपाशी’मध्ये केलेली श्यामची भूमिका यातले बारकावे लोकांना फारच आवडले.

… आणि विजय तेंडुलकर यांच्या येण्याने बदलले विश्व!

जब्बार पटेल यांनी पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. याच दरम्यान त्यांची भेट नाटककार विजय तेंडुलकर यांच्याशी झाली. तेंडुलकर यांच्यासह जब्बार पटेल यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तेंडुलकरांची त्यांनी बसवलेली ‘बळी’ही एकांकिका आणि ‘श्रीमंत’ नाटक त्यावेळी प्रचंड गाजलं. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनी बर्‍याच नाट्य स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. तेंडुलकरांनी जब्बार पटेलांना त्यांचे ‘अशी पाखरे येती’ हे अत्यंत तरल नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सादरीकरणासाठी दिलं. ते नाटक खूप गाजलं. त्यानंतर त्यांना ‘घाशीराम कोतवाल’ हे सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शित करण्याची संधी त्यांना मिळाली, हे नाटक पुढे खूप गाजलं.

वैद्यकीय सेवाही केली!

या सगळ्यादरम्यान त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं. जब्बार पटेल हे बालरोगतज्ज्ञ, तर त्यांची पत्‍नी स्त्री-रोगतज्ज्ञ. वैद्यकीय शिक्षण संपल्यावर त्यांनी आणि त्यांच्या पत्‍नीने प्रॅक्टिससाठी पुण्याजवळचे दौंड हे गाव निवडलं. हळूहळू प्रक्टिसमध्ये जम बसू लागला. पण तरीही दिवसभर प्रॅक्टिस करून संध्याकाळी ‘घाशीराम’च्या तालमींसाठी पुण्यात ते यायचे. त्यांची ही तारेवरची कसरत जवळपास साडेतीन महिने चालू होती.

‘सामना’तून मोठ्या पडद्यावर पदार्पण!

‘सामना’ या मराठी चित्रपटाद्वारे जब्बार पटेल मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. डॉ. जब्बार पटेलांनी अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. राजकीय सारीपाटावरचे शह-काटशह मांडणारे ‘सामना’, ‘सिंहासन’,  गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत ‘जैत रे जैत’, ‘मुक्ता’,  पु ल. देशपांडेनी लिहिलेला ‘एक होता विदूषक’ असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.

नाटक, चित्रपटांनंतर त्यांनी लघुपटांकडे आपला मोर्चा वळवला. त्यांचा कुसुमाग्रजांवरील लघुपट विशेष गाजला. या शिवाय ‘इंडियन थिएटर’, ‘मी एस. एम.’, ‘लक्ष्मणराव जोशी’, ‘कुमार गंधर्व’ या लघुपटांचे दिगदर्शन त्यांनी केले. प्रायोगिक नाटकांसाठी डॉ. जब्बार पटेल यांनी ‘थिएटर अकादमी’ या नाट्यसंस्थेची निर्मिती केली.

हेही वाचा :

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Sonu Nigam : सोनू निगमच्या हस्ते रितू जोहरीचा ‘द इमॉर्टल्स’ अल्बम लाँच

Kangana Ranaut : ‘आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा’.. पंगा क्वीन कंगना रनौतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रगणच #सव #त #रगभमच #सव #करणर #परतभवन #दगदरशक #ड #जबबर #पटल

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

टीम इंडियाच्या संकटमोचनचा खुलासा; इंग्लंडमध्ये विजयाचे उलगडलं रहस्य

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे पाचवी आणि निर्णायक कसोटी खेळली जात आहे. भारतीय संघाचा पहिला डाव ४१६ धावांत गुंडाळला....

Most Popular

सुरक्षिततेच्या दृष्टिने UPI PIN बदलत राहणे आवश्यक, पिन बदलण्यासाठी फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

UPI Payments: आजपासून काही वर्षांपूर्वी जर दुसऱ्या शहरात असलेल्या तुमच्या एखाद्या नातेवाईकाला पैसे पाठवायचे असल्यास तुम्हाला मोठी प्रक्रिया करावी लागायची. त्यावेळी पैशांचा व्यवहार...

संरक्षण क्षेत्रात भारताला मोठं यश, डीआरडीओने केली मानवरहित विमानाची उड्डाण चाचणी

बंगळुरू, 1 जुलै : भारताने संरक्षण क्षेत्रात (Indian Defence Sector) मोठी कामगिरी केली आहे. डीआरडीओद्वारा (DRDO) विकसित करण्यात आलेल्या मानवरहित विमानाचे (Unmanned Aircraft) पहिले उड्डाण...

Amazing Facts About July Month Babies : जुलै महिन्यात जन्मलेल्या मुलांबाबत काही अमेझिंग फॅक्ट्स, ज्या पालकांना देखील करतील सरप्राईज

July Born Baby Facts : जुलै महिन्यात जन्माला आलेली मुलं ही अतिशय आनंदी आणि फ्रेंडली असतात. या महिन्यात जन्माला आलेली मुलं अतिशय आश्चर्यकारक,...

अखेर बाप-लेकीची होणार भेट? अभिजीत खांडकेकरच्या भूमिकेत येणार मोठा ट्विस्ट

मुंबई: 'तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यामध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या (Abhijeet Khandkekar)...

Smartphone Offers: २७ हजारांच्या फोनवर मिळेल १५ हजारांपेक्षा अधिक डिस्काउंट, पाहा भन्नाट ऑफर

नवी दिल्ली :iQOO ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात iQOO Neo 6 ला लाँच केले होते. हा फोन कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येते. कंपनीने...

अमित शहांचा फोटो बॅनरवरून का काढला? सदाभाऊ खोतांनी उत्तर न देता काढला पळ

मुंबई, 02 जुलै : राजकीय सत्ता संघर्षानंतर अखेरीस शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे.  पण, देवेंद्र...