Thursday, July 7, 2022
Home करमणूक रिया चक्रवर्ती-शोविकसह इतरांवर NCB ने दाखल केले आरोप, 'या' तारखेला होणार सुनावणी

रिया चक्रवर्ती-शोविकसह इतरांवर NCB ने दाखल केले आरोप, ‘या’ तारखेला होणार सुनावणी


मुंबई, 23 जून- सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर उघडकीस आलेल्या ड्रग्स प्रकरणात सुमारे दोन वर्षांनी मुंबईतील विशेष न्यायालयात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अभिनेत्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), भाऊ शोविक चक्रवर्ती आणि इतर काहीजणांवर आरोप दाखल केला आहे. 12 जुलै रोजी या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान न्यायालयाने अद्यापही रियावर आरोप निश्चित केलेले नाहीत.

PTI च्या वृत्तानुसार, विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी सांगितलं की, त्यांच्या वतीने सर्व आरोपींविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केलेले सर्व आरोप कायम ठेवले आहेत. त्याचा उल्लेख न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्र करण्यात आला आहे. त्यांनी रिया आणि शोविकवर अमली पदार्थांचं सेवन तसेच मृत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसाठी अशा पदार्थांची खरेदी आणि पैसे देण्याचे आरोप निश्चित करण्याची विनंती केली आहे.NCB ने आरोपींवर कलम 8(c) 20(b)(ii)(a), 22, 27, 27A, 28, 29, आणि 30 नुसार अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांसह विविध आरोप केले आहेत.

नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्याशी संबंधित खटल्यांची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी 12 जुलै ही सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. अतुल सरपांडे यांनी सांगितले की, न्यायालय सर्व आरोपींवर आरोप निश्चित करणार होतं. मात्र, काही आरोपींनी दोषमुक्तीचे अर्ज दाखल केल्याने तसे होऊ शकले नाही. त्यांनी सांगितले की, दोषमुक्तीच्या अर्जावर निर्णय झाल्यानंतरच आरोप निश्चित केले जातील, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

Published by:Aiman Desai

First published:

Tags: Bollywood News, Drugs, Entertainment, NCB, Rhea chakraborty, Sushant sing rajputअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रय #चकरवरतशवकसह #इतरवर #NCB #न #दखल #कल #आरप #य #तरखल #हणर #सनवण

RELATED ARTICLES

Kolhapur News : कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 जुलैला आरक्षण...

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

Male Fertility : दररोज Sex करत असाल तर सावधान…कारण…

कस्तुरबा मेडिकल कॉलेज, MAHE-मणिपाल आणि युनिव्हर्सिटी ऑफ म्युन्स्टर, जर्मनीच्या संशोधकांनी Ejaculationची लांबी आणि त्याचा स्पर्म्सवर होणारा परिणाम यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अस्वीकरण:...

Most Popular

Kolhapur News : कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 जुलैला आरक्षण...

OMG! बंद डोळ्यांनी मोबाईलला स्पर्श करूनच फोटोची संपूर्ण कुंडली सांगते ही मुलगी

भोपाळ, 07 जुलै : तुमचा हात, चेहरा पाहून तुमची कुंडली सांगणारे ज्योतिषी तुम्हाला बरेच माहिती असतील. पण सध्या अशी एक चिमुकली चर्चेत आली आहे...

Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पुढील महिन्यापासून ही मोठी सुविधा

Indian Railways:  भारतीय रेल्वे वंदे भारत रेल्वेच्या दोन अपग्रेड व्हर्जन आणणार आहे. या दोन्ही नव्या गाड्या सध्याच्या वंदे भारतपेक्षा खूप वेगळ्या असतील. अस्वीकरण: ही...

पहिल्यांदा केला डान्स, नंतर धोनीने असा कापला केक; लंडनमध्ये Birthday साजरा

नवी दिल्ली, 07 जुलै : भारतीय संघाला आपल्या नेतृत्वाखाली दोन विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी (गुरुवारी (7 जुलै) 41 वर्षांचा झाला आहे. त्याचा...

7th July 2022 Important Events : 7 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

7th July 2022 Important Events : जुलै महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Mumbai : पोलीस दलातील बहुतांश पोलीस अधिकारी संजय पांडे निवृत्त होण्याची वाट पाहत होते? वाचा..

Mumbai Police : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची आता ईडी चौकशी सुरू झाली आहे. मंगळवारी ते...