Saturday, August 13, 2022
Home क्रीडा रिकाम्या हाती मायदेशी परतल्याने मेरी कोमने मागितली देशवासियांची माफी

रिकाम्या हाती मायदेशी परतल्याने मेरी कोमने मागितली देशवासियांची माफी


मुंबई : सहा वेळा विश्वविजेत्या मेरी कोमचं दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या प्रि-क्वार्टर फायनलमध्ये मेरी कोमला रिओ ऑलिम्पिक ब्राँझ मेडल विजेती इंग्रीट व्हॅलेन्सियाने मात दिली. यानंतर शनिवारी मेरी कोम भारतात परतली आहे. दरम्यान मायदेशी परतल्यानंतर मेरी कोमने देशवासियांची माफी मागितली आहे. 

मायदेशी परतल्यावर मेरी कोमला दिल्ली एअरपोर्टवरच पत्रकारांनी गाठलं. यावेळी मेरी कोम म्हणाली, “मेडल न जिंकता मायदेशी येणं मला अतिशय वाईट 
वाटतंय. दोन राऊंड सहजतेने जिंकल्यानंतर माझा कसा काय पराभव होऊ शकतो. रिकाम्या हाती आल्याने मी देशवासियांची माफी मागते.” 

इंग्रीट व्हॅलेन्सियाने मेरीचा 2-3 असा पराभव केला. मेरी कोमने या सामन्यात 3 पैकी 2 फेऱ्या जिंकल्या होत्या. मात्र तरीही मेरीचा पराभव झाला. मेरी कोमने प्री-क्वार्टर फायनलमधील ‘वाईट निर्णया’साठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बॉक्सिंग कृती दलाला जबाबदार धरलं.

दरम्यान सामन्यानंतर पीटीआयशी बोलताना मेरी कोम म्हणाली होती, ‘‘सामना संपल्यानंतर मी आनंदाने रिंगण सोडलं. कारण मी जिंकल्याचं मला वाटत होते. मला डोपिंग टेस्टसाठी त्यांनी नेलं, तेव्हासुद्धा मी शांत होते. समाजमाध्यमांवर आणि माझे कोच छोटेलाल यादव यांच्याकडून मी पराभूत झाल्याचं मला समजलं. मी याआधी दोनदा व्हॅलेन्सियाला हरवलं होते. त्यामुळे पंचांनी विजयी म्हणून तिचा हात उंचावला, यावर माझा विश्वासच बसेना,’’ 

मेरी पुढे म्हणाली ‘‘या निर्णयाविरुद्ध आढावा घेता येत नव्हता आणि निषेधही नोंदवता येत नव्हता. परंतु जगाने हे सर्व नक्की पाहिलंय. याची मला खात्री आहे. मी दुसरी फेरी जिंकले, मग अंतिम निकाल माझ्या विरोधात 3-2 कसा काय जाऊ शकतो. जे घडलं, ते पूर्णपणे माझ्यासाठी अनपेक्षित होतं.” 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रकमय #हत #मयदश #परतलयन #मर #कमन #मगतल #दशवसयच #मफ

RELATED ARTICLES

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात

<p>Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

तो बिर्याणी खातो आणि…; टीम इंडियाच्या गोलंदाजाबद्दल हे काय बोलून गेला Rohit sharma

रोहित शर्मा आता आगामी आशिया कपसाठी सज्ज झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Salman Rushdie : प्रसिद्ध लेखक सलमान रश्दींवर न्यूयॉर्कमध्ये चाकूहल्ला, हल्लेखोराला अटक ABP Majha

<p>वादग्रस्त लिखाणामुळे अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी मिळालेले, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ लेखक सलमान रश्दींवर अमेरिकेत प्राणघातक हल्ला झालाय.. न्यूयॉर्कमधील शुटाका इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमात भर...

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...