राहुल द्रविड हे श्रीलंकेच्या दौऱ्यावर भारताचे प्रशिक्षत होते. पण त्यापूर्वी ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक होते. पण बीसीसीआय आता त्यांना या पदावरुन मुक्त करत असल्याचे पाहायला मिळत आहे. द्रविड यांचा संचालकपदाचा कार्यकाळ संपला आहे आणि त्यामुळे बीसीसीआयने आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालक पदासाठी अर्ज मागवले आहेत. द्रविड जर या पदावर कायम राहीले तर त्यांना मोठी जबाबदारी सोपवता येऊ शकत नाही, त्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला असवा. त्याचबरोबर भारताचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कालावधीही काही महिन्यांमध्ये संपत आहे. त्यामुळे भारताला त्यानंतर नवीन प्रशिक्षकाची गरज लागणार आहे. द्रविड यांच्याकडे क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्याचबरोबर त्यांनी भारतीय संघाचे श्रीलंकेत प्रशिक्षकपदही भूषवले आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये आता ट्वेन्टी-२० विश्वचषकही होणार आहे. या विश्वचषकासाठी जर नवीन संघ आणि प्रशिक्षक नेमण्याचा विचार बीसीसीआय करत असेल तर नक्कीच द्रविड यांना हे पद मिळू शकते. त्यामुळे आता बीसीसीआयच्या मनात नेमकं काय आहे, हे काही दिवसांतच सर्वांपुढे येईल. त्यामुळे आता द्रविड यांना नेमकी कोणती जबाबदारी देण्यात येऊ शकते, हे काही दिवसांमध्येच स्पष्ट होऊ शकते.
भारतीय संघ सध्याच्या घडीला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ आयपीएल खेळण्यासाठी युएईला रवाना होणार आहे. त्यानंतर ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या विश्वचषकाच्या संघात आता भारतीय संघात नेमके काय बदल होतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल. त्यामुळे द्रविड आता पुन्हा भारतीय संघाचे प्रशिक्षकपद कधी सांभाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#रहल #दरवड #यन #मळ #शकत #आत #मठ #जबबदर #बससआयन #नमक #कय #कल #पह