Saturday, May 21, 2022
Home भारत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, काही नेत्यांची मागणी

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, काही नेत्यांची मागणी


Rahul Gandhi : सध्या उदयपूरमध्ये काँग्रसचे चिंतन शिबिर सुरु आहे. या शिबिरात काल दिवसभरात विविध मुद्यांवर चर्चा झाली. पण काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाहीत. पण राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी यावेळी काही नेत्यांनी केली आहे. तसेच सक्रिय असणाऱ्या नेत्याकडेच काँग्रसचे अध्यक्षपद देण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. 

काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे उदयपूर चिंतन शिबिरात काँग्रेस अध्यक्षाबाबत औपचारिक चर्चा झाली नसून, पक्षनेतृत्वात स्पष्टता हवी, अशी मागणी नेत्यांकडून होत आहे. यावेळी राहुल गांधी यांनीच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.यापूर्वी काँग्रेस कार्यकारिणीच्या सर्व बैठकांमध्ये राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष करण्याची मागणी वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या झालेल्या बैठकीत राहुल यांनी याबाबत आपण गांभीर्याने विचार करत असल्याचे नेत्यांना सांगितले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोनिया गांधी यांच्यावर पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी आली होती. 

काँग्रेसच्या या शिबिरामध्ये कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. या शिबिरात विविध समित्यांच्या बैठका पार पडणार आहेत. या समित्यांच्या बैठकांवेळी प्रत्येकाला आपापले मोबाईल बाहेर लॉकअपमध्ये ठेवून जायला सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या चिंतन शिबिरामध्ये ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि गुजरातमधील नेते हार्दिक पटेल उपस्थित नसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये राहुल यांची मोठी भूमिका 

राहुल गांधी यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तरीदेखील मोदी सरकारविरोधात केवळ ट्विटरवर सक्रियता दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. यावर बोलताना टी प्रतापन म्हणाले की, पक्षाध्यक्षांनी नियमितपणे सक्रिय रहायला हवं.

राहुल गांधींच्या दौऱ्यांवर टीका 

महत्त्वाच्या वेळी परदेश दौऱ्यावर गेल्याने राहुल गांधींवर टीका होत आहे. तसेच त्यांच्या नुकत्याच झालेल्या नेपाळ दौऱ्याबाबत, विविध प्रश्न उपस्थित केले गेले. दरम्यान, काँग्रेसच्या सुरु असलेल्या चिंतन शिबिरात मोठ्या बदलांबाबत चर्चा होणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच काही नेत्यांच्या मागणीप्रमाणे राहुल गांधी पुन्हा काँग्रसचे अध्यक्ष होणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#रहल #गध #यन #कगरसचय #अधयकषपदच #धर #सभळव #कह #नतयच #मगण

RELATED ARTICLES

Pune NCP Protest: लाल महालात लावणीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन ABP Majha

<p>पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटिंग झाल्याचं समोर आल्यानंतर मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या लावणी शुटिंगचा संभाजी ब्रिगेडने निषेध...

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

Most Popular

नवाब मलिकांचा पाय खोलात?मलिकांनी डी-गँगसोबत मनीलॉन्ड्रिंग केलं,कोर्टाचं निरीक्षण

मुंबई, 21 मे : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने (ED) अटक केली आहे. या प्रकरणात...

आता Traffic पोलीस थांबवू शकणार नाहीत Car, चेकिंगही करणार नाही; काय आहे नवा आदेश

नवी दिल्ली, 21 मे : जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी (Car Driving) महत्त्वाची आहे. सरकारने ट्रॅफिकबाबत नवे नियम लागू...

खूनी नाल्याजवळ बचाव मोहिमेदरम्यान दरड कोसळली; थरकाप उडवणार व्हिडीओ

श्रीनगर, 20 मे : रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील एका बांधकामाधीन बोगद्याच्या जागेवर ताज्या भूस्खलनामुळे बचावकार्य थांबवण्यात आले आहे. जवळच्या डोंगराचा एक भाग...

Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका

<p>Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

Covid19 effect : कोरोनाचं रौद्ररूप, आता कोरोनातून ब-या झालेल्या लोकांना सतावतंय ‘हे’ 1 भयंकर लक्षण..!

करोना व्हायरसचा (Coronavirus pandemic) धोका सध्या तरी कमी होताना दिसत नाहीये. अनेक देश कोरोनाच्या चौथ्या लाटेचा (Covid 4th wave) सामना करत आहेत. अर्थात,...

IPL मध्ये धोनीने खेळला शेवटचा सामना? पाहा कॅप्टन कूल काय म्हणाला

मुंबई : आयपीएल 2022 आता शेवटच्या टप्प्यात आहे. आयपीएलमध्ये कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. दरम्यान सीएसकेची टीम या वर्षी...