Saturday, July 2, 2022
Home भारत राष्ट्रवादीची आज महत्वाची बैठक, एकनाथ शिंदेंच्या भूमिकेनंतर शिवसेना पुढचं पाऊल काय उचलणार?

राष्ट्रवादीची आज महत्वाची बैठक, एकनाथ शिंदेंच्या भूमिकेनंतर शिवसेना पुढचं पाऊल काय उचलणार?


Maharashtra Political Crisis : आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष ‘वेट अँण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. एकनाथ शिंदेच्या भूमिकेनंतर शिवसेना पुढचं पाऊल काय उचलणार याकडे राष्ट्रवादीचे लक्ष आहे. या बैठकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्व नेते आणि मंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काल शिवसैनिक तसेच नाराज आमदारांशी संवाद साधला. तसेच तुमची इच्छा असेल तर मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादीने आपल्या सर्व आमदारांची उद्या बैठक बोलावली आहे.

…त्यामुळे सर्वच आमदार हजर राहणार

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना आज होणाऱ्या बैठकीला हजर राहण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. या बैठकीत शरद पवार आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याच बैठकीबाबतची अधिक माहिती राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी काल दिली आहे. “आज मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने आम्ही सर्व मंत्री एकत्र आलो होतो. उद्या राष्ट्रवादी पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. असे ते म्हणाले. शरद पवार यांची बैठक आहे. त्यामुळे सर्वच आमदार हजर राहणार आहेत. जयंत पाटील यांनी ही बैठक बोलावली आहे,” असे भरणे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.

राज्यातील राजकीय नाट्य सुरू, आजचा दिवस महत्त्वाचा
महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला असून आज तिसऱ्या दिवशी नाराजी नाट्य सुरू रहाणार असल्याचं स्पष्ट आहे.  शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर राज्य निर्माण झालेला पेच कसा सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरेंनी भावनिक साद घालत समोर या मी राजीनामा तयार ठेवतो असं म्हंटलं. या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील गुवाहाटीला पोहोचले असून उदय सामंतही गुवाहाटीला पोहचत आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी काय घडामोडी घडणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.  

महत्वाच्या बातम्या

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार, कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा भाजपचा आरोप 

Uddhav Thackeray : कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला…, ‘वर्षा’ते ‘मातोश्री’ दरम्यान शिवसैनिकांची तुफान गर्दी आणि घोषणाबाजीअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#रषटरवदच #आज #महतवच #बठक #एकनथ #शदचय #भमकनतर #शवसन #पढच #पऊल #कय #उचलणर

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

जिन्स पँटच्या पाठीमागच्या खिशात फोन ठेवताय?, ‘या’ ५ समस्याला तुम्ही निमंत्रण देताय

never keep phone in your back pocket : रस्त्यांवरून जात असताना आपल्या समोर असलेल्या व्यक्तीच्या मागच्या खिशात ठेवलेला स्मार्टफोन आपल्याला बऱ्याच वेळा दिसला...

नीरजचा आणखी एक धमाका, फक्त १६ दिवसात मोडला स्वत:चा विक्रम आणि जिंकले पदक

स्टॉकहोम (स्वीडन): टोकियो ऑलिंम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा(Neeraj Chopra )ने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. स्टॉकहोम डायमंड लीग(Stockholm Diamond League)मध्ये नीरजने ८९.९४ मीटर...

Dharmaveer : ‘धर्मवीर’ ठरला 2022 मधला सर्वात मोठा सुपरहिट ब्लॉकबस्टर मराठी सिनेमा

Dharmaveer : 'धर्मवीर' (Dharmaveer) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील...

मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

क्वालालंपूर : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय या भारतीय खेळाडूंनी गुरुवारी मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला व पुरुष...

‘रॉकेटरी’ ते ‘शाब्बास मिथू’, जुलै महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

July Upcoming Movies: या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये बॉलिवूडचे अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाले आहेत....

नवीन मोबाईल सिम खरेदी करण्याच्या नियमांत बदल, जाणून घ्या

जर तुम्ही नवीन सिम घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...