Saturday, November 27, 2021
Home टेक-गॅजेट राष्ट्रपती अशरफ घनी सत्ता सोडणार; तालिबानचा कमांडर मुल्लाह अब्दुल घनी बरादार राष्ट्राध्यक्ष 

राष्ट्रपती अशरफ घनी सत्ता सोडणार; तालिबानचा कमांडर मुल्लाह अब्दुल घनी बरादार राष्ट्राध्यक्ष 


काबुल : अफगाणिस्तानवर आता तालिबानने संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केलं असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत.  राष्ट्रपती अशरफ घनी यांनी आता अफगाणिस्तानच्या सत्तेवर पाणी सोडलं असून त्याचे हस्तांतरण करण्याची तयारी ठेवली आहे. तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकार स्थापन होत असून तालिबानचा कमांडर मुल्लाह अब्दुल घनी बरादार हा राष्ट्राध्यक्ष असेल अशी माहिती आहे.  

काबुल स्थित राष्ट्रपती परिसरातून अफगाणिस्तानला इस्लामी अमिरात बनवल्याची घोषणा करण्यात येणार असून तालिबानच्या या अंतरिम सरकारला चीनने समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानही तशा प्रकारचा अधिकृत निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती आहे. अमेरिका आणि नाटोचे सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी गेल्यानंतर काहीच अवधीत तालिबानी दहशतवादी संघटनेनं या देशावर कब्जा मिळवला आहे.  

अफगाणिस्तानवर आता तालिबानने नियंत्रण प्रस्थापित केलं असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत. या बिघडलेल्या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानमध्ये आता अनागोंदी माजली आहे. त्या पार्श्वभूमीवर जगभरातल्या 60 हून अधिक देशांनी आपल्या देशातील नागरिकांची सुखरुपपणे सुटका करावी अशी विनंती तालिबानकडे केली आहे. 

काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देश सोडून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या किमान सात जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. तालिबानच्या प्रश्नावर आज युरोपियन युनियनची आज महत्वाची बैठक असून या प्रश्नावर काय भूमिका घ्यायची यावर चर्चा होणार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि सचिव ब्लिन्केन यांनी अमेरिकन सैन्याच्या माघारीचे समर्थन केलं आहे.

संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अॅन्टोनिया गुटेरस यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बोलताना तालिबानने हिंसाचाराचा मार्ग सोडावा असं आवाहन केलं होतं. महिला आणि बालकांचे अधिकार आणि सुरक्षा यावर त्यांनी विशेष चिंता व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या : अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#रषटरपत #अशरफ #घन #सतत #सडणर #तलबनच #कमडर #मललह #अबदल #घन #बरदर #रषटरधयकष

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Arjun Khotkar : ईडीकडून खोतकरांच्या घराची तब्बल 18 तास झाडाझडती, आजदेखील छापेमारी होणार

Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी...

Most Popular

दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

दिल्ली, 27 नोव्हेंबर: अनेकांना कॉफी (Coffee) प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यावर, ऑफिसमध्ये काम करताना किंवा थकल्यावर मेंदू आणि शरीराला पुन्हा तरतरी आणण्यासाठी कॉफी...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

Box Office Report: बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; ‘बंटी और बबली 2’ ची निराशा

Box Office Report :   चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर सर्व सिनेमा प्रेमींनी थिएटर्सकडे धाव घेतली. अभिनेता अक्षय कुमारचा  (Akshay Kumar)...

लस घेऊनही एवढ्या टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज नाहीत!

ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा; मनप्रीतकडे भारताचे नेतृत्व

पुढील महिन्यात ढाका येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या २० सदस्यीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कर्णधार मनप्रीत सिंगकडे...