Friday, August 12, 2022
Home लाईफस्टाईल राशीभविष्य: मिथुन, कन्या, कुंभ राशीसाठी दिवस चांगला; पाहा तुमच्या राशीचं भविष्य

राशीभविष्य: मिथुन, कन्या, कुंभ राशीसाठी दिवस चांगला; पाहा तुमच्या राशीचं भविष्य


आज दिनांक 4 ऑगस्ट 2021 वार बुधवार. सहा राशींसाठी दिवस चांगला आहे. तुमची रास कुठली पाहा भविष्य..

आज दिनांक 4 ऑगस्ट 2021 वार बुधवार. सहा राशींसाठी दिवस चांगला आहे. तुमची रास कुठली पाहा भविष्य..

आज दिनांक 4 ऑगस्ट 2021 वार बुधवार. आज कामिका एकादशी आहे. चंद्र मृग नक्षत्रात मिथुन राशीत असणार आहे. पाहू या आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष
आज दिवस अनुकूल असून काही विशेष बोलणी सुरू होतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. प्रकृतीकडे थोडं लक्ष असू द्या. कार्यक्षेत्रात विशेष भरारी घ्याल. दिवस शुभ.

वृषभ
आर्थिक स्थिती मध्ये भरभराट देणारा हा दिवस आहे. दोन दिवस जाणवणारा ताण कमी होईल. कामाच्या ठिकाणी अचानक काही नवीन घडामोडी होतील. दिवस चांगला जाईल.

मिथुन
आज राशीतील चंद्र  तुम्हाला  आनंदी ठेवेल. परदेशी जाण्याची संधी  येऊ शकते. त्यासंबंधी काही चर्चा होईल. धार्मिक कार्य निष्ठेने कराल. कला  प्रकारांमध्ये रुची वाढेल. दिवस उत्तम.

कर्क
आज उदास मन अणि थकवा यापासून जपा. काहींना अचानक प्रवासाचे योग येतील. तुमच्या राशीत असलेला  बुध  तुम्हाला योग्य मार्ग सुचवेल. दिवस मध्यम आहे.

सिंह
आज अनेक प्रकारे  लाभ होतील. मित्र मैत्रिणींसोबत आनंदात दिवस घालवा. शक्यतोवर एकट्याने प्रवास टाळा. प्रकृती कडे लक्ष असू द्या. दिवस शुभ.

कन्या
आज काही घडामोडी मुळे तुमच्या  कार्यक्षेत्रातील प्रतिष्ठा वाढेल .घराकडे सुद्धा खूप लक्ष देणे आवश्यक आहे. व्यय स्थानातील मंगळ डोळ्यांची काळजी घ्या असे सुचवीत आहे. दिवस चांगला जाईल.

तुला
आज दिवस शुभ असुन भाग्य तुमची साथ देणार आहे. कालपर्यंत जाणवणारा निरुत्साह  आणि प्रकृतीची तक्रार आज कमी होईल. ईश्वरी उपासना सफल होईल. दिवस शुभ.

वृश्चिक
आज शारीरिक त्रास वाढण्याची शक्यता आहे. प्रवास टाळा. कोणाशी वाद, गैरसमज टाळा. आज दिवस घरात शांततेत  नामस्मरण करण्यात घालवा. दिवस मध्यम जाईल.

धनु
आजचा दिवस  हा व्यवसाय, भागीदारी मध्ये सामंजस्य  निर्माण करणारा आहे. कामाच्या ठिकाणी अचानक काही  जास्तीचे काम येईल. अष्टमात सूर्य प्रकृती थोडी नाजूक ठेवेल. दिवस मध्यम.

मकर
राशीतील शनिच्या समोर सूर्य अणि षष्ठ चंद्र आज तुम्हाला सांभाळून राहण्याचा संकेत देत आहे. कुटुंबात मतभेद, खर्चात वाढ आणि एकूण निरुत्साह राहील. दिवस मध्यम.

कुंभ
आज पंचम चंद्र गुरूशी शुभ योग करीत आहे. दिवस आनंदात जाईल. आध्यात्मिक प्रगती होईल. शिक्षण क्षेत्रात यश मिळवून देणारा दिवस आहे. संतती संबंधी शुभ समाचार मिळतील. दिवस शुभ.

मीन
घर अणि कुटुंब यात आज रमून जाल. घरात काही विशेष काम उरकून घ्या. आर्थिक नियोजन नीट असू द्या. बाकी दिवस आनंदात जाईल. शुभम भवतु!!

First published:

astrology and horoscoperashibhavishyaअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रशभवषय #मथन #कनय #कभ #रशसठ #दवस #चगल #पह #तमचय #रशच #भवषय

RELATED ARTICLES

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

पुढील देशांतर्गत हंगामात अर्जुन गोव्याकडून खेळणार?; मुंबईकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पुढील देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडून खेळण्याची दाट शक्यता आहे. २२ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज...

पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

Maharashtra Rain : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत....

बिहारमधील सत्तांतराचा NDA ला फटका? आज निवडणूक झाल्यास मिळणार इतक्या जागा

मुंबई 12 ऑगस्ट: महाराष्ट्र आणि त्यानंतर बिहारमध्ये झालेल्या सत्तानाट्यानंतर इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांनी मुड ऑफ द नेशन या नावाने एक सर्व्हे केला...

हिपॅटायटिसने प्रत्येक 30 सेकंदाला होतो 1 मृत्यू, WHO च्या टिप्स

हिपॅटाइटिस (Hepatitis Virus) हा एक प्रकारचा व्हायरस आहे जो शरीरात जाऊन लिव्हरला सूज येण्यामागचे प्रमुख कारण ठरतो. लिव्हर हा आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण...

पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली; मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प

Land Slide on Pune Mumbai Railway : खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प...

जम्मू-काश्मीरमधील हत्येचं सत्र थांबेना; आणखी एका युवकाची गोळी झाडून हत्या

श्रीनगर 12 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी शुक्रवारी आणखी एका प्रवाशाची गोळ्या झाडून हत्या केली. मोहम्मद अमरेज असं 19 वर्षीय मृताचं नाव...