Saturday, May 21, 2022
Home क्रीडा रायुडू रॉक चाहते शॉक! अंबातीच्या एका ट्विटने चेन्नई सुपर किंग्जच्या गोटात खळबळ!

रायुडू रॉक चाहते शॉक! अंबातीच्या एका ट्विटने चेन्नई सुपर किंग्जच्या गोटात खळबळ!


मुंबई, 14 मे : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) धडाकेबाज फलंदाज अंबाती रायडू याच्या एका ट्विटने चाहते शॉक झाले. अंबाती रायडू (Ambati Rayudu) याने ट्विट करून या आयपीएल हंगामानंतर या स्पर्धेतून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, अवघ्या दोन तासांतच त्यांनी आपल्या विधानावर यु टर्न घेत निवृत्तीबाबत केलेले ट्विट डिलीट केले. आता रायुडूने निवृत्तीचे ट्विट का केले आणि नंतर डिलीट का केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या ट्विटनंतर चेन्नई सुपर किंग्जमध्ये सर्व काही ठीक चालले आहे का? रायुडूने निवृत्तीबद्दल ट्विट केले होते, जे नंतर डिलीट करण्यात आले. रायडूने लिहिले, “मी आनंदाने जाहीर करतो की हा माझा शेवटचा आयपीएल हंगाम असेल. मी गेल्या 13 वर्षांत दोन महान संघांसोबत राहिलो. या अद्भुत प्रवासासाठी मी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे आभार मानू इच्छितो.”
2019 मध्येही असाच यू टर्न
रायुडू 2018 पासून चेन्नई सुपर किंग्जमध्ये होता. यादरम्यान, त्याने 2018 आणि 2021 मध्ये CSK सोबत जेतेपदही जिंकले. क्रिकइन्फोच्या मते, रायुडूच्या निवृत्तीच्या ट्विटनंतर चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापनाने त्याच्याशी संवाद साधला. यानंतर फलंदाजाने त्याचे ट्विट डिलीट केले. रायुडूने निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्ये, विश्वचषक संघात निवड न झाल्यानंतरही त्याने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. पण, नंतर यू-टर्न घेतला आणि देशांतर्गत आणि आयपीएल क्रिकेटमध्ये परतला.
देशाची लोकसंख्या 30 हजार, पण या पठ्ठ्यांनी T20 क्रिकेटमध्ये केला वर्ल्ड रेकॉर्ड!
रायुडू हा आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी खेळाडू
रायुडू हा आयपीएलमधील टॉप 10 सर्वात अनुभवी क्रिकेटपटूंमध्ये मोडतो. पाच विजेतेपदांसह तो दुसरा सर्वात यशस्वी आयपीएल क्रिकेटर आहे. केवळ रोहित शर्मा (सहा) याच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त आयपीएल जेतेपदे आहेत. त्याचे पाच आयपीएल जेतेपद (किरॉन पोलार्डसह) संयुक्त-दुसरे आहेत.

रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना, रायुडूने 2013, 2015 आणि 2017 मध्ये मुंबईसोबत आयपीएल ट्रॉफी जिंकला होता. त्यानंतर 2018 आणि 2021 मध्ये त्याचा सध्याचा संघ सुपर किंग्ससह आयपीएल ट्रॉफी जिंकली. आयसीएलशी संलग्न असल्यामुळे रायुडूला पहिली दोन वर्षे खेळता आलं नाही. रायुडूने आतापर्यंत 187 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या 4187 धावा आणि 22 अर्धशतक आहेत. याशिवाय त्याने शतकही ठोकले आहे. रायुडू आयपीएल खेळत असला तरी. पण, देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो क्वचितच पाहायला मिळतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रयड #रक #चहत #शक #अबतचय #एक #टवटन #चननई #सपर #कगजचय #गटत #खळबळ

RELATED ARTICLES

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Best 5G Phone: नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाच

Best 5G Phone 2022: गेल्या काही वर्षात भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक कंपन्या दरआठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत...

Most Popular

अभिनंदन नीता भाभी…; नीता अंबानींविषयी केलेलं विजय मल्ल्याचं ते ट्विट व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं भवितव्य आता मुंबई इंडियन्सच्या हातात आहे. अशातच विजय मल्लाचं ट्विट व्हायरल झालं आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

अश्विनच्या आक्रमणापुढे चेन्नई फेल, विजयानंतर स्वत:ची केली वॉर्नरशी तुलना

मुंबई, 21 मे : राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) पॉईंट्स टेबलमधील दुसऱ्या क्रमांकासह आयपीएल 2022 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश मिळवला आहे. राजस्थाननं शुक्रवारी झालेल्या...

“काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावणार?”

मुंबई, 21 मे : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने (BJP) आगामी 2024 च्या निवडणुकीची (2024 Lok Sabha Election) तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे...

Mumbai Ahmedabad Highway वर खाद्यतेलाचा टॅंकर उलटला, महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प

<p>Mumbai Ahmedabad Highway वर खाद्यतेलाचा टॅंकर उलटला, महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Todays Headline 21st May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं...

आता Traffic पोलीस थांबवू शकणार नाहीत Car, चेकिंगही करणार नाही; काय आहे नवा आदेश

नवी दिल्ली, 21 मे : जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी (Car Driving) महत्त्वाची आहे. सरकारने ट्रॅफिकबाबत नवे नियम लागू...