Saturday, July 2, 2022
Home भारत रामदास आठवलेंची शिवसेनेतील बंडावर कविता

रामदास आठवलेंची शिवसेनेतील बंडावर कविता


 सांगली : आपल्या कवितांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आता  एकनाथ शिंदे यांच्या बंडावर कविता केली आहे. “एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे खंदे आणि आता ते राहिले नाहीत अजिबात अंधे, म्हणून आता आमच्या सोबत येत आहेत  एकनाथ शिंदे” अशा शब्दात कविता करून एकनाथ शिंदे भाजपसोबत येणार असल्याचा दावा आठवलेंनी केला आहे.  सांगलीतील सामुहिक आत्महत्या झालेल्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी म्हैसाळला भेट दिल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

एकनाथ शिंदे यांचे महाबंड असून त्यांचाच गट म्हणजे आता खरी शिवसेना आहे असे मत आठवलेंनी व्यक्त केले. आठवले म्हणाले, महाविकास आघाडी अनैसर्गिक होती, बंडाळीमुळे शिवसेनेतील असंतोष बाहेर पडला आहे. महाविकास आघाडीचा विकासाचा अजेंडा नव्हता. त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीसहून अधिक आमदार बंडामध्ये सहभागी झाले. राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे तोंड काळे झाले.  शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांचे मत भाजपसोबत युती करण्याचे होते. मात्र संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदापायी उध्दव ठाकरे यांची दिशाभूल केली. यापूर्वी भुजबळ, राणे, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, त्यावेळेपेक्षा आताची स्थिती वेगळी असून हे महाबंड आहे. शिंदे यांचा गटच खरी शिवसेना मानतो. भाजपने आता सरकार स्थापन करण्यासाठी  पुढाकार घ्यावा. महाराष्ट्रतील परिस्थिती  सध्या अस्थिर आहे, शिंदे यांनी केलेले बंड शिवसेनेला हा जबरदस्त झटका आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लागला आहे.

शिवसेनेतील बंडावर रामदास आठवलेंची कविता

‘ज्यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्तेचे  बंद केलेले आहे धंदे;  त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे 

एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे खंदे  आणि आता ते राहिले नाहीत अजिबात अंधे, म्हणून आता आमच्या सोबत येत आहेत  एकनाथ शिंदे

राष्ट्रपती निवडणुकीसाठी पवाराचा  बळीचा बकरा बनविण्याचा डाव

राष्ट्रपती निवडणुकीसाठी शरद पवार यांना उभे करून बळीचा बकरा बनविण्याचा  संजय राऊत यांचा डाव होता. मात्र पवार मुरब्बी राजकारणी असल्याने त्यांनी राष्ट्रपती निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले असेही आठवले म्हणाले.

अजित पवार यांच्या सारखा एकनाथ शिंदे यांचा प्रयोग फसणार नाही

 अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस याच्या सोबत शपथविधी घेताना नियोजन केले नव्हते. शपथविधीला जाण्याअगोदर आपल्या सोबत किती आमदार येतील याची चाचपणी अजित पवार यांनी करायला हवी होती. त्यामुळे त्यावेळी सरकार स्थापन्याचा प्रयोग फसला. मात्र अजित पवार यांच्या सारखा  एकनाथ शिंदे यांचा हा प्रयोग फसणार नाही असे आठवले म्हणालेत.

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#रमदस #आठवलच #शवसनतल #बडवर #कवत

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

टीम इंडियाच्या संकटमोचनचा खुलासा; इंग्लंडमध्ये विजयाचे उलगडलं रहस्य

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे पाचवी आणि निर्णायक कसोटी खेळली जात आहे. भारतीय संघाचा पहिला डाव ४१६ धावांत गुंडाळला....

Most Popular

अमित शहांचा फोटो बॅनरवरून का काढला? सदाभाऊ खोतांनी उत्तर न देता काढला पळ

मुंबई, 02 जुलै : राजकीय सत्ता संघर्षानंतर अखेरीस शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे.  पण, देवेंद्र...

तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना कामावरून का काढलं? Byju’s नं अखेर सांगितलं मोठं कारण

मुंबई, 01 जुलै: 27 जून रोजी संध्याकाळी बायजूस कंपनीनं (Byjus Company) त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला. काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यवस्थापक आणि एचआरचे फोन...

Pune Crime News: धक्कादायक! शाळेतून घरी येताना 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Pune Crime News: पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात गुरुवारी शाळेतून घरी जात असताना एका व्यक्तीने 11 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पंतच्या शतकाने इंग्लंडचा अहंकार मोडला आणि जागा झाला ‘इंद्रानगरचा गुंड’

बर्मिंगहॅम: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने १०० धावांपर्यंत ५ विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर ऋषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या समाचार घेतला....