Uddhav Thackeray On Raj Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील बीकेसीत भव्य सभा घेत आपल्या विरोधकांचा समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही हल्ला चढवला आहे. अभिनेता संजय दत्त याच्या मुन्नाभाई चित्रपटाचा उल्लेख करत ते म्हणाले आहेत की, ”मुन्नाभाई चित्रपटात त्याला गांधीजी दिसतात, तसं एकाला बाळासाहेब दिसतात, नाव न घेता त्यांनी राज ठाकरे यांच्यावर अशी टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ”संजय दत्तला जसे सिनेमात गांधीजी दिसतात तशी एक केस आहे, आपल्याकडे. स्वतः ला बाळासाहेब समजायला लागतात. शाल घालतात. सिनेमात शेवटी संजय दत्तला कळत की डोक्यात केमिकल लोचा झालाय, असे मुन्नाभाई फिरताहेत.” आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले आहेत की, ”आता आदित्य तिरुपतीला गेला होता, आता अयोध्येला जाईल. रामजन्मभूमीला मी जाताना शिवनेरीची पवित्र माती नेली. तेव्हा चमत्कार योगायोग म्हणा आपल्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो, त्याचे भांडवल आम्ही केले नाही.”
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#रज #ठकर #महणज #कमकल #लचच #कस #उदधव #ठकरच #टक