मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात 19 जुलै रोजी अटक केली. पतीच्या अटकेनंतर शिल्पा पहिल्यांदा व्हर्चुअल ऍपियरेंस देणार आहे. सध्या या महत्त्वाच्या कारणामुळे शिल्पा चर्चेत आहे. या लाईव्ह व्हिडिओमध्ये फक्त शिल्पा उपस्थित राहणार नाही, तर या कार्यक्रमामध्ये अन्य सेलिब्रिटी देखील उपस्थित राहणार आहे. लाईव्ह इव्हेन्टमध्ये हे सर्व सेलिब्रिटी एका स्क्रिनवर दिसणार आहेत. 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.30 सुमारास हा इव्हेन्ट फेसबुकवर ग्लोबली स्ट्रीम होणार आहे.
या इव्हेन्टमध्ये शिल्पा शेट्टी शिवाय एड शीरीन, एआर रहमान, फरहान अख्तर, अर्जुन कपूर, फराह खान, फरहान अख्तर, जावेद जाफरी, जावेद अख्तर, कबीर खान, कल्कि केक्ला, करण जोहर, मिक जैगर, परिणीति चोप्रा, राहुल बोस, राजकुमार हिरानी, सैफ अली खान, सोनू सूदसह कलाविश्वातील अन्य कलाकार उपस्थित राहणार आहेत.
एका महत्त्वाच्या कारणासाठी हे सर्व कलाकार एकत्र येणार आहेत. शिल्पा शेट्टी फंडरेजर प्रोग्राम We For India: Saving Lives, Protecting Livelihoods चा भाग असणार आहे. हे एक जागतिक डिजिटल ब्रॉडकास्ट आहे जे भारतात कोविड मुक्तीसाठी 25 कोटींचा निधी उभारण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, राज कुंद्राच्या अटकेनंतर शेट्टी आणि कुंद्रा कुटुंब सतत चर्चेत आहेत. रोज पॉर्नोग्रफी प्रकरणात नव-नवीन खुलासे होणार आहेत. आता शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईवर फसवणुकीचे आरोप होत आहेत. त्यामुळे चर्चा तुफान रंगत आहे. अखेर या प्रकरणात कोणतं सत्य समोर येईल याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#रज #कदरचय #अटकनतर #पहलयद #शलप #शटट #दसणर #य #करयकरमत