Friday, May 20, 2022
Home मुख्य बातम्या राज्य सरकारकडून राज ठाकरेंना Y+ दर्जाची सुरक्षा, तरीही बाळा नांदगावकर संतापले

राज्य सरकारकडून राज ठाकरेंना Y+ दर्जाची सुरक्षा, तरीही बाळा नांदगावकर संतापले


मुबई, 13 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या (Mosque loud speaker sound) मुद्द्यांवर घेतलेल्या भूमिकेनंतर धमकीचे फोन (threaten call) आणि पत्र येत होते. त्यामुळे मनसे (MNS) नेत्यांकडून त्यांना सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु होती. अखेर मनसे नेत्यांची ही मागणी राज्य सरकारने (Maharashtra Government) मान्य केली आहे. महाविकास आघाडी सरकारने राज ठाकरे यांना Y प्लस दर्जाची सुरक्षा प्रधान केली आहे. राज ठाकरे यांना याआधी Y प्लस दर्जाचीच सुरक्षा होती. पण मध्यंतरी राज्य सरकारने Y प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेतली होती. अखेर राज्य सरकारने पुन्हा राज ठाकरे यांना Y प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. राज्य सरकारडून देण्यात आलेल्या या सुरक्षेवरुन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त करत राज्य सरकार थट्टा करत आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले?

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे याच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकार मनसेची थट्टा करत आहे आहे का? सुरक्षेत वाढ करण्याच्या नावाखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत एक पोलीस आणि एक इन्स्पेक्टर वाढवला असल्याचा आरोप बाळा नांदगावकर यांनी केला आहे.

“मी राज्याच्या गृहमंत्र्यांना काही दोष देणार नाही. राज्य सरकारने निर्णय घ्यायला हवा. राज्य सरकारची एक समिती असते ही समिती कुणाला किती सुरक्षा पुरवायची याबाबतचा निर्णय घेते. या समितीत मुख्यमंत्री आणि आणखी एक-दोन जण असतात. राज ठाकरे यांची Z सेक्युरिटी होती. ती तुम्ही कमी करुन Y केली. मी गृहमंत्र्यांना भेटून पुन्हा Z दर्जाची सुरक्षा द्या म्हणून विनंती केली होती. पण आज मी जेव्हा राज ठाकरेंच्या घरी गेलो तेव्हा एक इन्स्पेक्टर आणि एक पोलीस दिला आहे. मग कशाला सुरक्षा देताय? थट्टा सुरुय. सुरक्षा देऊच नका. सरकार म्हणून निर्णय घ्यायची आवश्यकता आहे. तुम्ही सरकार म्हणून शपथ घेतात तेव्हा द्वेष करणार नाही, समानतेची वागणूक देऊ अशी शपथ घेतात. ज्यांना गरज नाही त्यांना प्रचंड सुरक्षा देवून ठेवली आहे. ज्यांना गरज आहे त्यांनाच का सुरक्षा दिली जात नाही? राज ठाकरे हा खुल्या दिलाचा माणूस आहे. जे पोटात आहे ते ओठात आहे. ते मनात काही ठेवत नाही”, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

(“पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर…” नितेश राणेंचं ओपन चॅलेंज)

राज ठाकरे यांनी गेल्या दीड महिन्यात औरंगाबाद, ठाणे आणि मुंबई इथे तीन सभा घेतल्या. त्यांच्या या तीनही सभा प्रचंड गाजल्या. त्यांच्या भाषणांमुळे महाराष्ट्राचं राजकारण अतिशय तापलं आहे. या दरम्यान राज ठाकरे यांना वारंवार धमकीचे फोन येत आहेत. तसेच त्यांना धमकीचे मेसेज येत आहेत. त्यामुळे बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली होती. याशिवाय महाराष्ट्र सरकारकडून जेव्हा राज ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती तेव्हा देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन सुरक्षा वाढण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांना पुन्हा Y प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. पण राज्य सरकारच्या या निर्णयावर बाळा नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंना केंद्र सरकार विशेष सुरक्षा पुरवणार?

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडल्यानंतर त्यांनी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार ते 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या घोषणेच्यावेळी एक महत्त्वाची बातमी समोर आली होती. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती समोर आली होती. तसेच राज ठाकरेंना उत्तर प्रदेश सरकारकडूनही विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती समोर आली होती. आता राज ठाकरे यांना खरंच केंद्र सरकार सुरक्षा पुरवते का? ते आगामी काळात नक्कीच समोर येईल.

तुमच्या शहरातून (मुंबई)

 • मोठी बातमी ! डी गँगसोबत संबंध असलेल्या दोघांना NIAने ठोकल्या बेड्या, छोटा शकीलच्या सोबतीने सुरू होते गैरव्यवहार

  मोठी बातमी ! डी गँगसोबत संबंध असलेल्या दोघांना NIAने ठोकल्या बेड्या, छोटा शकीलच्या सोबतीने सुरू होते गैरव्यवहार

 • Anil Deshmukh यांना मोठा झटका, खासगी रुग्णालयात उपचाराला कोर्टाचा नकार

  Anil Deshmukh यांना मोठा झटका, खासगी रुग्णालयात उपचाराला कोर्टाचा नकार

 • Thane CCTV: वर्दीतील देवमाणूस! स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा LIVE VIDEO

  Thane CCTV: वर्दीतील देवमाणूस! स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा LIVE VIDEO

 • "आम्ही चॅलेंज स्वीकारलं; ...तुम्हालाही त्याच मातीत गाडणार" औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणाऱ्या ओवैसींना संजय राऊतांचा इशारा

  “आम्ही चॅलेंज स्वीकारलं; …तुम्हालाही त्याच मातीत गाडणार” औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणाऱ्या ओवैसींना संजय राऊतांचा इशारा

 • महागाईचा भडका, आता PUC चाचणीचा दर वाढला, दुचाकींसाठी 50 ते चार चाकींसाठी 150 रुपये मोजा

  महागाईचा भडका, आता PUC चाचणीचा दर वाढला, दुचाकींसाठी 50 ते चार चाकींसाठी 150 रुपये मोजा

 • महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज ठाकरेंसाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण....

  महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज ठाकरेंसाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण….

 • Weather Update: उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारा ; पण आपल्याच राज्यात या गावात स्वेटर चढवण्याएवढा गारठा

  Weather Update: उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारा ; पण आपल्याच राज्यात या गावात स्वेटर चढवण्याएवढा गारठा

 • "पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..." नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

  “पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर…” नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

 • Terror Funding Case : दाऊद इब्राहिम, छोटा शकीलच्या काळ्या धंद्यांचे हस्तक, आरोपींनी कोर्टात गायलं देशभक्ती गीत

  Terror Funding Case : दाऊद इब्राहिम, छोटा शकीलच्या काळ्या धंद्यांचे हस्तक, आरोपींनी कोर्टात गायलं देशभक्ती गीत

 • Sanjeevani Karandikar: बाळासाहेब ठाकरे यांची बहीण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन

  Sanjeevani Karandikar: बाळासाहेब ठाकरे यांची बहीण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन

 • Exclusive : डी गॅंगच्या टार्गेटवर हिंदुत्ववादी राजकीय नेते, मोठा घातपात घडवण्याचा कट, NIAच्या तपासात मोठा खुलासा

  Exclusive : डी गॅंगच्या टार्गेटवर हिंदुत्ववादी राजकीय नेते, मोठा घातपात घडवण्याचा कट, NIAच्या तपासात मोठा खुलासा

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#रजय #सरकरकडन #रज #ठकरन #दरजच #सरकष #तरह #बळ #नदगवकर #सतपल

RELATED ARTICLES

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी; देशात सापडला ओमिक्रॉनच्या BA.4 व्हेरियंटचा पहिला रुग्ण

हैदराबादः भारतात करोना संसर्ग आता आटोक्यात येत आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतात...

Most Popular

Upcoming Phones: पुढील महिन्यात भारतात एंट्री करणार Realme चा ‘हा’ पॉवरफुल स्मार्टफोन, फीचर्स एकदा पाहाच

नवी दिल्ली : Realme GT Neo 3T To Debut in India : Realme लवकरच आपल्या नवीन दमदार स्मार्टफोनला भारतीय बाजारात लाँच करण्याची शक्यता...

Live Updates: मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित

ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ  1 जूनला मध्य प्रदेशात जाणार,  पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ मध्य प्रदेशात जाणार;  चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर, प्रवीण घुगेंसह पदाधिकाऱ्यांचा...

अजय-अतुलमुळे झाला होता ‘पुष्पा’फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू

मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अत्यंत गोड आणि...

Todays Headline 20th May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं...

संभाजीराजे महाविकास आघाडीकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार? मुख्यमंत्री संभाजीराजे यांच्यात चर्चा

Sambhaji Raje  meets cm Uddhav Thackeray : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर...

प्राजक्ताचा रानबाजार नंतरचा ‘तो’ फोटो चर्चेत, फॅन्स विचारत आहेत, ‘ आता हे काय ‘

मुंबई, 19 मे- अभिनेत्री प्राजक्ता माळी( Prajakta Mali ) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांची मुख्य भूमिका असलेला ‘रानबाजार’ या (RaanBaazaar Trailer) वेबसिरीरीजचा...