Maharashtra School : राज्यात वाढत्या कोरोनामुळं पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. शाळा बंद करण्याच्या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे. यावर बोलताना आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली. टोपे म्हणाले की, शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असून याबाबत 15 दिवसांनी परिस्थिती पाहून पुनर्विचार केला जाईल. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी असल्याने अनेकांनी शाळा सुरू करण्याची मागणी आहे. याबाबत 15 दिवसांचा अंदाज घेऊन मुख्यमंत्र्यांच्या विचाराने निर्णय घेतला जाईल असेही टोपे म्हणाले.
15 ते 18 वयोगटातील 42 टक्के मुलांना लस- टोपे
लसीकरणाच्या सुरुवातील एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बोलताना राजेश टोपे म्हणाले की, आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपण 90 टक्के लोकांना पहिला डोस दिला आहे. आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. आपण 62 टक्क्यांपर्यंत लोकांना दुसरा डोस दिला आहे, असं टोपे म्हणाले. जे लोकं डोस घेत नाहीत त्यांची जनजागृती करुन त्यांनाही डोस दिला जाईल. 15 ते 18 वयोगटातील 42 टक्के मुलांना आपण लस आतापर्यंत दिली आहे, असं देखील टोपे यांनी सांगितलं.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर – राजेश टोपे
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच ब्रीच कँडीच्या मॅनेजमेंटला त्यांनी विनंती केली की, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसंदर्भातील सर्व अपडेट माध्यमांना द्यावेत. तसेच मॅनेजमेंट आणि मंगेशकर परिवार एकत्रित चर्चा करून आरोग्य विषयक माहिती माध्यमांना देतील, असंही त्यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#रजयत #शळ #पनह #कध #सर #हणर #आरगयमतर #रजश #टपच #मठ #वकतवय