Saturday, July 2, 2022
Home भारत राज्यातील सत्तासंघर्षात TMC ची एन्ट्री, ममता दीदींनी दिली आमदारांना ऑफर!

राज्यातील सत्तासंघर्षात TMC ची एन्ट्री, ममता दीदींनी दिली आमदारांना ऑफर!


मुंबई, 23 जून : राज्यातील राजकीय संकट (Maharashtra Political Crisis) कायम आहे. शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) यांच्या विरोधात बंड पुकारलाय. सर्व बंडखोर आमदार यावेळी गुवाहाटीमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. राज्यातील या राजकीय संकटात आता तृणमूल काँग्रेसचे (TMC) एन्ट्री झाली आहे. गुरूवारी गुवाहाटीमधील हॉटेलच्या बाहेर तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. त्यानंतर आता बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी (Mamata Banerjee) या सर्व प्रकरणात भाजपाला लक्ष्य केलंय.
‘हिंदुस्थान टाईम्स’नं दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. पूरग्रस्त आसाममध्ये आमदारांना का पाठवलं जात आहे? असा सवाल त्यांनी विचारलाय. महाराष्ट्रातील आमदारांना बंगालमध्ये पाठवा, आम्ही त्यांचं आदरातिथ्य करू, अशी ऑफर ममता दीदींनी दिली आहे.
ममता बॅनर्जी यांनी भाजपावर लोकशाही गळा घोटल्याचा आरोप केलाय. भाजपानं संघराज्याची रचना पूर्णपणे उद्धवस्त केल्याचं आपल्याला दु:ख आहे, असं त्यांनी म्हंटलंय. त्याचवेळी ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांच्यावर टीका केलीय.
‘हिमंत बिस्वा सर्मा यांची प्राथमिकता स्पष्ट आहे. सरकार बंडखोर आमदारांचं यजमानपद करत असून दिल्लीतून येणाऱ्या आदेशांचं पालन करण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे प्रयत्न केल्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना राज्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यात रस असता तर…’ अशा आशयाचं ट्विट बॅनर्जी यांनी केलं आहे.
काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमधून पाठिंबा काढणार? नाना पटोलेंचं स्पष्ट विधान
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा यापूर्वी गुजरातमधील सुरतमध्ये मुक्काम होता. त्यानंतर त्यांनी गुवाहाटी गाठलं आहे. आसामचे मुख्यमंत्री  हिमंत बिस्वा सरमा यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आसाम आंतरराष्ट्रीय राजकारणाचं केंद्र झालं तर आपल्याला आनंद आहे, कारण त्यामुळे राज्यातील महसुलात वाढ होण्यास मदत होईल, असं उत्तर सर्मा यांनी दिलंय.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

महाराष्ट्र

महाराष्ट्र

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#रजयतल #सततसघरषत #TMC #च #एनटर #ममत #ददन #दल #आमदरन #ऑफर

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

एकनाथ शिंदेंना शिवसेना नेतेपदावरुन हटवले

मुंबई : शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्यावर  कारवाई केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणीत भर पडली...

फडणवीस खरंच नाराज? किरीट सोमय्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्याचं कारण

मुंबई 01 जुलै : 8 ते 10 दिवसांच्या हालचालींनंतर अखेर राज्याच्या राजकारणात गुरुवारी मोठी घडामोड घडली. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर गुरुवारी एकनाथ...

स्वयंपाकीने दिली माही- जयला जीवे मारण्याची धमकी, दोन वर्षांच्या ताराला म्हणाला खंजीर खुपसेन

मुंबई- टीव्हीचं स्टार कपल जय भानुशाली आणि माही विज यांच्याशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. दोघांनी गुरुवारी (३० जून) पोलिसांत तक्रार दाखल...

आकाश हा निळ्या रंगाचा का असतो? यामागील कारण फरच रंजक

पृथ्वीवरुन निळ्या रंगाचे आकाश दिसते, मग मंगळावरुन कोणत्या रंगाचे आकाश दिसत असेल, तुम्हाला माहितीय? अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

मुंबईच्या तुफान पावसात बोमन इराणींनी म्हटली मराठी कविता; पाहा Video

मुंबई 1 जुलै: हिंदीतील एक कुशल अभिनेता म्हणून बोमन इराणी (Boman Irani) यांचं नाव घेतलं जातं. बोमन इराणी गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने...

VIDEO: नीरज चोप्राची नवी भरारी, स्वत:चाच रेकॉर्ड तोडला

नवी दिल्ली, 01 जुलै : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने नव-नवीन विक्रमांची नोंद करणे सुरूच...